Pro Wrestling League Season 2 - Get Ready for असली दंगल

Submitted by श्री on 31 December, 2016 - 05:01

Pro Wrestling League Season 2 - Get Ready for असली दंगल.
देशभर दंगल सिनेमाचा फिवर जोरात असतानाच २ जानेवारीपासुन दिल्ली येथील खाशाबा जाधव इनडोर स्टेडियममध्ये PWL Season 2 च्या मॅचेस सुरु होत आहे. दंगल सुलतान आणि साक्षी मलिकने कुस्तीला ग्लॅमर आणलयं आणि त्यात आता PWL भर घालतेय.

PWL Season 2 च्या मॅचेस २ जानेवारी पासुन १९ जानेवारी २०१७ पर्यंत असतील , पहिलीच मॅच २ जानेवारीला मुंबई महारथी विरुद्ध हरियाणा हॅमर्स आहे.

टीम्सची नावं पण इंटरेस्टिंग आहेत , मुंबई महारथी , हरियाणा हॅमर्स , दिल्ली सुलतान्स , युपी दंगल , जयपुर Ninjas , NCR पंजाब रॉयल्स.

प्रत्येक टीममध्ये ५ भारतीय आणि ४ विदेशी रेस्लर्स आहेत , त्यात २ भारतीय महिला , ३ भारतीय पुरुष , २ विदेशी महिला आणि २ विदेशी पुरुष आहेत.

स्टारकास्ट जबरदस्त आहे , साक्षी मलिक दिल्लीकडुन खेळतेय , फोगाट भगिनी दिल्ली सुलतान्स , युपी दंगल्स , जयपुर Ninjas मध्ये विखुरल्या आहेत , मराठी कुस्तीपटु राहुल आवारे मुंबई महारथीकडुन , अमित धनकर युपी दंगल कडुन आणि उत्कर्ष काळे जयपुर Ninjas कडुन खेळतील.आणि इतर अनेक वर्ल्ड चँपियन्स वेगवेगळ्या टीम्सकडुन खेळतील.

Channels: Sony Max and Sony ESPN with Hindi and English feed.

Time: 7 PM to 9 PM

http://www.prowrestlingleague.com/ ह्या वेबसाईटवर पुर्ण टीम्सची माहिती बघता येईल.

Then Get Ready for Asali Dangal.

PWL2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच अॉलिंपिक पदक विजेते, विश्व विजेते, आणि कॉमनवेल्थमधले अनेक चांगले चांगले खेळाडू उतरणार आहेत.

बरेच अॉलिंपिक पदक विजेते, विश्व विजेते, आणि कॉमनवेल्थमधले अनेक चांगले चांगले खेळाडू उतरणार आहेत.>> आणि आपले भारतातले तीन पदक विजेते खेळाडू खेळणार नाहीयेत.. सुशील, योगेश्वर आणि नरसिंग..

हयियाणा vs मुंबई लढतीमध्ये आज हरियाणाने बाजी मारली. ७ लढतींपैकी हरियाणा च्या रजनीश , अब्दुलसलाम गदीसोव , सोफिया मॅटसन , मारवा आम्रीने एकुण ४ लढ्ती जिंकल्या आणि मुंबईच्या एरिका वेब ,राहुल आवारे आणि जब्रायल हस्नोव्हने एकुण ३ लढती जिंकल्या.

आपले भारतातले तीन पदक विजेते खेळाडू खेळणार नाहीयेत.. सुशील, योगेश्वर आणि नरसिंग..>>> काय कारण होतं माहित आहे का ?

गेल्या वर्षी मुंबईने दोन्ही वेळेला हरियाणा ला हरवले होते, लीग मध्ये आणि नंतर फायनल ला. यावेळी हरियाणाच्या लोकांनी तगडी टीम उतरवलेली.

३ जानेवारी ची लढत NCR Punjab Royals Vs Jaipur Ninjas मध्ये झाली. Jaipur Ninjas ने ५-२ ने ही मॅच जिंकली.
जयपुर कडुन Jakob Makarashvili , पुजा धांडा , Jenny Fransson , विनोद्कुमार ओम्प्रकाश , Elizbar Odikadze हे जिंकले
NCR पंजाब कडुन Vladimir Khinchegashvili , Odunayo Folasade Adekuoroye मॅच जिंकले.

यावेळी हरियाणाच्या लोकांनी तगडी टीम उतरवलेली. >>> +१ . जयपुरने पण जोरदार सुरुवात केलीय.

जयपुर टीमचा उत्कर्ष काळे मात्र हरला.

उद्या आता साक्षी मलिक चा पहिला मुकाबला. दिल्ली सुलतान्स वि. जयपुर निंजा.
जयपुरवाल्यांनी पहिल्या मॅचमध्ये पंजाबला मात दिलीये. आता बघु कसे करतात.

गंमत म्हणजे, साक्षी आणि तिचा होनेवाला सत्यव्रत एकाच टीममध्ये आहेत. त्यांच्याकडे मारीया स्डँडनिक पण आहे, तिने २०१२ आणि २०१६ ला ऑलिम्पिक सिल्वर घेतलय. ती आता रितू फोगाटशी खेळेल तर साक्षी वि. पुजा धांडा

जयपुर टीमचा उत्कर्ष काळे मात्र हरला.

हो पण त्याने भारी फाईट दिली Khinchegashvili ला. (याचा उच्चार करताना बोबडी वळतीये). वर्ल्ड चंपियन आहे तो शेवटी

उद्या आता साक्षी मलिक चा पहिला मुकाबला. दिल्ली सुलतान्स वि. जयपुर निंजा.>>> आशु , साक्षीच्या लढतीची जाम उत्सुकता आहे.

़४ जानेवारीच्या हरियाणा हॅमर्स vs युपी दंगल मध्ये पण हरियाणाने ५-२ ने बाजी मारली , लागोपाठ २ मॅचेस जिंकल्यात हरियाणाच्या टीमने , जबरदस्त फॉर्मात आहे.
हरियाणाकडुन रजनीश , अब्दुलसलाम गदीसोव , सोफिया मॅटसन , संदीप तोमर , Magomed Kurbanaliev ने लढती जिंकल्या.
युपीकडुन Elitsa Yankova , Maria Mamashuk जिंकले.
बबित्ता सोफिया मॅट्सनकडुन हरली , सोफियाने २०१६ ऑलिंपिकमध्ये ब्राँझ मिळवलं होतं.
अमित धनकर Magomed कडुन हरला , Magomed ने २०१६ वर्ल्ड चँपियनशिपमध्ये गोल्ड जिंकलं होतं. २०१६ मध्ये ४ स्पर्धांमध्ये त्याने गोल्ड मिळवलयं.

हो पण त्याने भारी फाईट दिली Khinchegashvili ला. >>> +१ सही मॅच झाली ती , अगदी सही दंगल. किन्चिगॅश्ली असा काहीसा उच्चार ऐकु येतो मॅच बघताना.

हो पण त्याने भारी फाईट दिली Khinchegashvili ला. >>> +१ सही मॅच झाली ती , अगदी सही दंगल.> खरच भन्नाट झालीये की मॅच.. एकदम टफ फाईट.. पुढचे सगळे प्रतिस्पर्धी जपून खेळणार ह्याच्या विरुद्ध खेळताना..

मुंबईवाले दुसरी मॅच पण हरले. किन्चिगॅश्ली कडून राहूल आवारे हरला, तर एरीका जखमी झाली होती पण तरी भारी खेळली. बाकी काय पाहिल्या नाहीत.

आता मुंबई वि. युपी दंगल. दोन्ही टीम्स एकही मॅच जिंकल्या नाहीयेत. बघुया कसे काय होते ते

प्रीतम ( मुंबई ) आणि पंकज राणाची ( NCR पंजाबची ) बर्‍यापैकी टफ झाली, व्हिडिओ सापडला तर लिंक देईन.
http://www.prowrestlingleague.com/page/Day_4__Mumbai_Maharathi_Vs_NCR_Pu... इथे आहे तो व्हिडिओ , फक्त १९ वर्षांचा पोरगा आहे तो प्रीतम , पण काय भिडला पंकज राणाला , जबरदस्त.

किन्चिगॅश्ली कडून राहूल आवारे हरला >>> किन्चिगॅश्ली जबरदस्त आहे,

६ जानेवारीच्या दिल्ली vs जयपुरच्या लढतीत जयपुरने ४-३ ने बाजी मारली.
साक्षी मलिकने जबरद्स्त खेळत जयपुरच्या पुजा धांडाला हरवलं , पण सत्यव्रत हरला.
उत्कर्ष काळे पण दिल्लीच्या Erdenebat कडुन हरला.
२ ते ५ जानेवारी पर्यंतचे व्हिडिओज येथे बघता येतील.

सत्यव्रत अगदीच हुकला होता. त्याला नाहीच जमल खेळायला.

साक्षी एकच नंबर, पुजा कुठेच बरोबरीची नव्हती. अगदीच वन साईडेड झाली.

मज्जा येणारे जेव्हा साक्षी आणि गीता फोगाट समोरासमोर येतील तेव्हा....

७ जानेवारी
अखेर मुंबई महारथी जिंकले युपीला ५-२ ने हरवलं.
मुंबईचे प्रीतम , एरिका , कॅरोलायना , सरिता , जब्रायल जिंकले तर युपीचे आंद्रे आणि अमितकुमार जिंकले.

८ जानेवारी
NCR पंजाबने दिल्लीविरुद्धची मॅच ५-२ ने जिंकली.
आतापर्यंतचा स्कोर ,मुंबईची टीम बरीच मागे पडलीय , हरियाणा आणि जयपुर फॉर्मात आहेत.
Leauge Table 8 Jan 17.JPG

९ जानेवारी
विजय कसा खेचुन आणायचा तर मुंबई सारखा . मुंबईने जयपुरला ४-३ ने हरवलं.
राहुल आवारे विरुद्ध उत्कर्ष काळे लढतीत राहुल आवारे जिंकला, तर एरिका वईब इंज्युअर्ड होऊनही जिंकली .

मुंबई , जयपुर , NCR पंजाब , हरियाणाचे प्रत्येकी ४ पाँईट्स झाले आहेत.

१० जानेवारी
आजची NCR पंजाब vs युपीची मॅच , NCR पंजाब ने ५-२ ने जिंकली .
अमित धनकर ( युपी) आणि Odunayo (NCR पंजाब ) जबरदस्त खेळले.
ही मॅच हरल्यामुळे युपीची अवस्था कठीण झालीय.

याची तिकिटे चक्क फक्त १० रुपयाला आहेत. Sad
१३ तारखेच्या मुंबई विरूध्द दिल्ली लढतीची तिकिटे ऑनलाईन बुक केली आत्ताच.
आमच्या घरी बाप- लेक गेल्या वर्षीपासूनच सगळ्या मॅचेस फॉलो करत आहेत.

याची तिकिटे चक्क फक्त १० रुपयाला आहेत >>> फक्त १० रुपये ? अरेरे , येवढ्या जबरदस्त लाईव्ह मॅचेस होत असताना सुद्धा ही अवस्था, आपल्याकडे फक्त सिनेमा किंवा ठरावीक गेम्सचीच लोकांना क्रेझ आहे.

आमच्या घरी बाप- लेक गेल्या वर्षीपासूनच सगळ्या मॅचेस फॉलो करत आहेत.>>> वाह !

११ जानेवारी
हरियाणाने दिल्लीला ५-२ ने हरवलं. हरियाणा फुल्ल फॉर्ममध्ये आहे ३ पैकी ३ ही मॅचेस जिंकल्यात.

कदाचीत साक्षी जिंकली असती तरी टीम जिंकणं अवघड होत. दिल्ली आणि युपीच आव्हान जवळपास संपत आलयं. अजुन २ मॅचेस आहेत त्या २ ही मॅचेस जिंकल्या आणि जयपुर किंवा मुंबई उरलेल्या सगळ्या मॅचेस हरले तर कदाचीत टाय होऊ शकेल , मे बी.
साक्षी मलिकला फायनलमध्ये पहायला आवडलं असतं.

ह्याचे रेकॉर्डेड भाग मिळू शकतील का बघायला ?
मला वाटत ते 10 रुपये तिकीट सर्व लोकांना सामील करून घ्यायला केले असावे असा एक अंदाज .

आम्ही उद्या जातोय दिल्ली विरूध्द मुम्बई बघायला.

सध्या प्रो बॅटमिंटन पण सुरू आहे. आज कॅरोलिनाची मॅच बघायला स्टेडियमवर गेली आहे मंडळी.

मस्तच अल्पना , एवढ्या नावाजलेल्या इंटरनॅशनल खेळाडुंचे लाईव्ह गेम्स बघायला मिळणं खरचं भारी आहे.
सेमी फायनल आणि फायनलला गर्दी होईल बहुतेक त्यामुळे जर जाणार असाल तर शक्य झालं तर आताच तिकिटं बुक करा.

जयपुरने युपीला ४-३ ने हरवलं. युपी आतापर्यंत ४ ही मॅचेस हरले , अजुन एक मॅच शिल्लक आहे पण उपयोग नाही.

सोमवारपासून शाळा सुरु होतिल. त्यामूळे सेमीफायनल आणि फायनल स्टेडियमवर बघायला नाही जमणार. उद्याची तिकिटे काढलेली आहेत.

Pages