चला मंडळी! आहात का तयार यंदाच्या फ्रेंच ओपन आवृत्तीसाठी?
सालाबादप्रमाणे याही वर्षी नदालच विजेतेपदाचा चषक उचलताना दिसणार की जोकोव्हिक/ झव्हेरोव्ह/ थिम/ सिट्सिपास पैकी एक नदालचा इथला जिंकण्याचा मक्ता संपवणार?
२ आठवड्यापुर्वी माद्रिद ओपनमधे झेव्हेरोव्हने नदालला उपांत्यपुर्व फेरीतच गारद करुन थोडी खळबळ माजवली पण गेल्या आठ्वड्यात नदालने इटालियन ओपनमधे झव्हेरोव्हला उपांत्यपुर्व फेरीत हरवुन त्या पराभवाचे उट्टे काढले. तेवढेच नाही तर इटालियन ओपनच्या फायनलमधे नदालने जोकोव्हिकला हरवले व त्याचे तिथले १० वे इटालियन ओपन विजेतेपद जिंकुन त्याच्या गोटात सगळे आलबेल आहे हे दाखवुन दिले.
यंदाचे फ्रेंच ओपन जुन ऐवजी आता सुरु झाले. सुरुवात वेगळ्या ऋतुत होत आहे .... पण शेवट नेहमीसारखाच... नदालच्या विजयाने होइल का ... की डॉमिनिक थिम किंवा जाकोव्हिक या वर्षी त्याला यशस्वी आव्हान देतील?
त्या तिघांनी सुरुवात तर स्ट्रेट सेटमधे त्यांचे सामने जिंकुन केली आहे. पण ऑक्टोबरच्या थंड हवेत.. टेनिस बॉल व रोलां गॅरसची तांबडी माती.. वेगळे रुप दाखवतील का?
तुमचे काय मत?
"जीता दिल इंडिया का, जीतनी है दुनिया,
ये बस टीम नही है, ये है इंडिया"
गेल्या दोन महिन्यांपासून दर दोन मिनिटाला TV वर ऐकू येणारी ही Anthem ऐकून उत्सुकता नक्कीच वाढलेय. ही उत्सुकता आहे कबड्डी वर्ल्डकप 2016 ची. उद्यापासून चालू होतोय.(कदाचित माझ्यासारखे बरेच असतील पहिल्यांदाच हा वर्ल्डकप बघणारे.)
अभिनंदन .... माननिय नवनियुक्त खासदार सचिन रमेश तेंडुलकर
.
.
काल सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी "१० जनपथ" वर गेले होते. तिथे गेल्यावर सोनिया गांधींनी सचिन यांना काँग्रेस च्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार पद देउ केले. ते सचिन ने स्विकारले. सचिन बरोबर अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आगा यांना सुध्दा खासदार पद देउ केले.