चला मंडळी! आहात का तयार यंदाच्या फ्रेंच ओपन आवृत्तीसाठी?
सालाबादप्रमाणे याही वर्षी नदालच विजेतेपदाचा चषक उचलताना दिसणार की जोकोव्हिक/ झव्हेरोव्ह/ थिम/ सिट्सिपास पैकी एक नदालचा इथला जिंकण्याचा मक्ता संपवणार?
२ आठवड्यापुर्वी माद्रिद ओपनमधे झेव्हेरोव्हने नदालला उपांत्यपुर्व फेरीतच गारद करुन थोडी खळबळ माजवली पण गेल्या आठ्वड्यात नदालने इटालियन ओपनमधे झव्हेरोव्हला उपांत्यपुर्व फेरीत हरवुन त्या पराभवाचे उट्टे काढले. तेवढेच नाही तर इटालियन ओपनच्या फायनलमधे नदालने जोकोव्हिकला हरवले व त्याचे तिथले १० वे इटालियन ओपन विजेतेपद जिंकुन त्याच्या गोटात सगळे आलबेल आहे हे दाखवुन दिले.
यट अनादर ग्रँडस्लॅम.. यट अनादर धागा !
यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २४ मे रोजी सुरु होत आहे.
पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. यंदाच्या क्ले सिझनमध्ये राफाची कामगिरी नेहेमीसारखी झालेली नाही. ज्योको मात्र अफाट खेळला आहे. राफा जिंकला तरी किंवा हरला तरी इतिहास घडणारच आहे पण कुठला ते बघायचं!
गतविजेती शारापोव्हा यंदाही क्ले सिझनमध्ये फॉर्ममध्ये आहे.
मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.
यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २५ मे रोजी सुरु होत आहे.
पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. शिवाय गेल्या वर्षभरात प्रभावी कामगिरी केलेला 'स्टॅन द मॅन' आणि डेव्हिड फेरर कसे खेळतात ह्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. यंदाचा क्ले सिझन नदाल साठी संमिश्र गेलेला असल्याने नदाल त्याच्या 'घरच्या' कोर्टवर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असेल.
यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २६ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. ब्रिटीश अँडी मरेने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिलांमध्ये अग्रमानांकीत सेरेना विल्यम्स, गतविजेती मारिया शारापोव्हा आणि तृतिय मानांकीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांच्यात विजेतेपदाची चुरस असेल. गेल्यावर्षी पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसलेली सेरेना विल्यम्य यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.
पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि फेडरर एका हाफमध्ये आले आहेत तर नदाल आणि मरे एका हाफमध्ये आहेत. महिला एकेरीत सेरेना वि शारापोव्हा अशी उपांत्यपूर्व फेरी रंगू शकते.