फ्रेंच ओपन टेनिस - २०१५

Submitted by Adm on 21 May, 2015 - 23:23

यट अनादर ग्रँडस्लॅम.. यट अनादर धागा !

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २४ मे रोजी सुरु होत आहे.

पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. यंदाच्या क्ले सिझनमध्ये राफाची कामगिरी नेहेमीसारखी झालेली नाही. ज्योको मात्र अफाट खेळला आहे. राफा जिंकला तरी किंवा हरला तरी इतिहास घडणारच आहे पण कुठला ते बघायचं!

गतविजेती शारापोव्हा यंदाही क्ले सिझनमध्ये फॉर्ममध्ये आहे.

मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
(वेबसाईटची मात्र बर्‍यापैकी वाट लावली आहे!)

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पग्या वेबसाईट बद्दल जोरदार अनुमोदन..

नवीन स्टाईलनी करण्याच्या नादात पारच बट्ट्याबोळ केला आहे... योग्य ठिकाणी निषेध नोंदवणार आहे..

फेडरर हल्ली दावेदार वाटत नाही Sad . नुकताच रोम मास्टर्स मध्ये जोकर कडून पराभव पत्करावा लागला.
आणि ड्रॉ पण अवघडच येणार मानांकन कमी असल्याने.

अरे त्या मरेला पण धरा. यंदा एक क्ले स्पर्धा जिंकली ना त्यानं.

यंदा नादाल आणि आमचा नेहमीचा घोडा दोघांना सपोर्ट करणार Happy

अजून तरी कोणता अनपेक्षित निकाल लागलेला नाही.
व्हिनसच पहिल्या दुसर्‍या फेरीत हरणं हे आता 'अपेक्षित'च झालेलं आहे. Sad

लोकहो,

बेंजामिन बेकर आणि फर्नांडो व्हर्डास्को यांच्या सामन्याचा निकाल वैशिष्ट्यपूर्ण आहे. बेकरने २४ गेम जिंकले तर व्हर्डास्कोने तब्बल २९ गेम जिंकले. तरीही बेकर विजयी झाला आहे. कारण त्याने जास्त सेट जिंकले आहेत. निकाल असा आहे : बेकर विजयी विरुद्ध व्हर्डास्को ६-४ ०-६ १-६ ७-५ १०-८

या सामन्यात व्हर्डास्को दुर्दैवी ठरला आहे. हा अतिशय दुर्मिळ प्रकारचा निकाल आहे. सैद्धांतिकदृष्ट्या जेत्याचे गेम पराजित्याहून फारतर ८ ने कमी असू शकतात. प्रस्तुत प्रसंगी हा फरक ५ पर्यंत पोहोचला आहे.

आ.न.,
-गा.पै.

फार काही दुर्मिळ नाहीये हा प्रकार. If I am not wrong, तुम्ही सेम अशीच पोस्ट मागे पण एका ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान लिहिली होतीत.

पराग आणि सिंडरेला,

>> तुम्ही सेम अशीच पोस्ट मागे पण एका ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान लिहिली होतीत.

ती इथे आहे :
http://www.maayboli.com/node/35167?page=1#comment-2135130

जेत्याचे एखाद दोन गेम कमी असणं ठीकाय. अशा वेळेस आकडेवारी पाहता दोन्ही भिडू समतुल्य असतात. मात्र इथे चक्क पाचचा फरक आहे. त्यामुळे सामन्याची आकडेवारी बघितली तर व्हर्डास्को ठळकपणे चांगला खेळलेला दिसतो. तरी तो हरला. हे दुर्मिळ आहे.

आकडेवारी :
becker_verdasco_match.jpg

आ.न.,
-गा.पै.

काल वॉझनियाकि हारली. सेरेनाची मॅच पण टफ होती (म्हणे).

आज फेडररनं सहज जिंकलेली दिसतेय मॅच. शारापोवा जिंकतेय की. मेहुत आणि सायमनची मॅच किती वेळ सुरू आहे.

नवी साइट किती भिकार आहे Angry

ह्यावेळेला नादाल आणि ज्योको एकाच ड्रॉ मध्ये की .. म्हणजे सेमी/क्वारटर ला वगैरेच भिडणार का?

गो ज्योको ..

मला वेबसाईट करता काहिही प्रॉब्लेम जाणवत नाहीये .. बदल आवडतोय असं नाही पण प्रोब्लेमॅटिक वाटत नाही ..

क्रोम वापरून बघितलं का?

माझ्याकडे सफारी आणि क्रोम वर व्यवस्थित चालत आहे साइट ..

हो आणि मी इकडे यायचं किंवा तुमच्या कोणाशीही बोलायचंही टाळेन .. रुसवे फुगवे, मानापमान, वादविवाद, भांडणं इत्यादी दूर ठेवायला आणि आंतर सभासदीय सद्भावना राखून ठेवायला .. Proud

च्च! पुन्हा तेच? अहो खेळाच्या धाग्यावर तरी खिलाडु वृत्ती दाखवा. दाखवा फक्त, बाळगा म्हणतच नाहीये Wink

रच्याकने, सशल, जोको जिंकला तर तुला एक मॅनिक्युअर गिफ्ट सर्टिफिकेट माझ्यातर्फे Wink

अय्या, खरंच ..

आणि नादाल जिंकला तर ते आपण बोललो होतो ते गिफ्द्ट सर्टिफिकेट त्याला माझ्यातर्फे .. Proud

Pages