फ्रेंच ओपन टेनिस - २०१५

Submitted by Adm on 21 May, 2015 - 23:23

यट अनादर ग्रँडस्लॅम.. यट अनादर धागा !

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २४ मे रोजी सुरु होत आहे.

पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. यंदाच्या क्ले सिझनमध्ये राफाची कामगिरी नेहेमीसारखी झालेली नाही. ज्योको मात्र अफाट खेळला आहे. राफा जिंकला तरी किंवा हरला तरी इतिहास घडणारच आहे पण कुठला ते बघायचं!

गतविजेती शारापोव्हा यंदाही क्ले सिझनमध्ये फॉर्ममध्ये आहे.

मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
(वेबसाईटची मात्र बर्‍यापैकी वाट लावली आहे!)

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इएसपिएनवर पहाटे पाच ते दहा. मग टेनिस चॅनेल, मग १२ पासून एनबीसी वर आहेत. (मी पाहिल्या नाहीत अजून पण हे शेड्यूल विश्वसनीय सुत्रांकडून समजलं आहे.)

मी पण एक सुद्धा मॅच बघितलेली नाही. एटीपी आणि फ्रेंच ओपनच्या साइटवर हायलाइट्स बघते वेळ होइल तसा.

विश्वसनीय सुत्रांशी बोललास काय तू? पुढल्यावेळी मला कॉन्फ करा.

शुगर कोटेड विखार >>> Biggrin

>> विश्वसनीय सुत्रांशी बोललास काय तू? पुढल्यावेळी मला कॉन्फ करा.

पण मी काय म्हणते विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती पराग देतोच आहे की तुला .. मग त्यांच्यात तुला का जायचंय? की पराग विश्वसनीय नाही असं म्हणतेस? Proud

(आता अ‍ॅड्मिन येऊन "विषयाला धरून बोला" अशी नेहेमीची दरारायुक्त मिश्कील धमकी देतील काय?)

यंदा प्रक्षेपण निओ स्पोर्ट्स वर आहे... आणि ते टाटास्काय वर दिसत नाही.. त्यामुळे यंदा फक्त नेटवरच फॉलो करता येतय..

अझारेंका सेरेना बघितली पूर्ण. सेरेनाने खेचली फुलटू !
अझारेंकाला दुसर्‍या आणि तिसर्‍या दोन्ही सेट्समध्ये चान्स होता.

काय हे .. दोन सेट्स नंतर थांबवायची तर सुरूच का केली मॅच ..

एकदम इंटरेस्टींग चलू होती फेडरर आणि मॉनफी ची मॅच ..

सशल,

>> दोन सेट्स नंतर थांबवायची तर सुरूच का केली मॅच ..

दुसरा सेट संपला तेव्हा २०३० वाजले होते. २१३० वाजेपर्यंत संधिप्रकाश असतो. जर दुसरा सेट फेडररने जिंकला असता तर तिसरा सेट खेळवून सामना पूर्ण करायचा योग आणता आला असता.

आ.न.,
-गा.पै.

सिंडरेला,

>> तीन सेटमध्ये सामने गुंडळले जातील या गृहितकावर वेळापत्रक आखतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

पूर्ण वेळापत्रक नाही तरी एखाद्या सामन्यापुरतं हे गृहीतक असू शकतं. फेडरर आणि मॉन्फिल्स यांच्यात फेडरर दादा आहे. तो तीन सेटांत सामना संपवू शकतो अशी अटकळ आयोजकांनी बांधली असावी.

मानांकन हेही देखील एक प्रकारचं गृहीतकच आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

मानांकन हेही देखील एक प्रकारचं गृहीतकच आहे >>> सिरियसली?

सेरेनाची मॅच बघतय का कुणी? पहिला सेट हरेल असं वाटतंय.

सेरेना पहिला सेट १-६ !!
एकंदरीत सेरेनाला मॅचेस अवघड जात आहेत ह्या स्पर्धेत असं दिसतय.

सिंडरेला,

>> सिरियसली?

दैव जाणिले कुणी...! गृहीतक नाही तर दुसरं काय आहे? सर्वोच्च दोन तुल्यबळ खेळाडू एकमेकांशी खेळतांना अंतिम फेरी असावी हे गृहीत धरून केलेली आखणीच ना?

आ.न.,
-गा.पै.

गेले तीन वर्ष सलग फायनलला होती. त्यात दोनदा जिंकली. ह्यावर्षीचा क्ले सिझनपण चांगला खेळली होती. ती कधीही ढेपाळू शकतेच पण इतक्या लवकर बाहेर जाईल असं वाटलं नव्हतं.

पुरुष उपांत्य पूर्व फेरी समने जबरी होणार..

फेडेक्स(२) वि. वावरिंका(८)
जोको(१) वि. नदाल(६)
मरे(३) वि. फेरर(७)
निशिकोरी(५) वि. त्सोंगा(१४)

सीड ४ ला १४ नी बदलले आह

त्यामानाने महिलांमधे.. नेहमी प्रमाणेच.. पहिली सेरेना आणि मग डायरेक्ट सातवी सीड इव्हानोविच शिल्लक आहे पहिल्या ८ पैकी.. सेरेना जिंकायची शक्यता फारच वाढली आहे.. नाहीतर मग यंदा अजून एक नवीन विजेती मिळायची शक्यता आहे...

काल स्लोननी सेरेनाला दमछाक करायला लावली आहे..

जोकोच्या कालच्या मॅचमधे पहिल्या सेटचे पहिले ३ गेम मस्त झाले.... रिचर्ड टफ फाईट देईल अस वाटलेल पण नंतर वन साईड झाली...
दुसर्‍या सेटमधला रेचर्ड्चा स्मॅशवरचा रिर्ट्न मस्त होता......

सोंगा इज ऑन रोल! दुसर्‍या सेटमध्ये गेम ब्रेक केलेला दिसतोय. कुणी बघतय का म्याच? भारतात तुम्हा लोकांना संध्याकाळच्या मॅचेस निवांत बघता येत असतील .

ज्यांचे ज्यांचे घोडे धारातीर्थी पडले त्यांचं सांत्त्वन ..

आम्ही उद्या सांत्त्वन करणार की करवून घेणार हे केवळ काळच ठरवेल ..

Pages