फ्रेंच ओपन टेनिस - २०१५

Submitted by Adm on 21 May, 2015 - 23:23

यट अनादर ग्रँडस्लॅम.. यट अनादर धागा !

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २४ मे रोजी सुरु होत आहे.

पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. यंदाच्या क्ले सिझनमध्ये राफाची कामगिरी नेहेमीसारखी झालेली नाही. ज्योको मात्र अफाट खेळला आहे. राफा जिंकला तरी किंवा हरला तरी इतिहास घडणारच आहे पण कुठला ते बघायचं!

गतविजेती शारापोव्हा यंदाही क्ले सिझनमध्ये फॉर्ममध्ये आहे.

मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
(वेबसाईटची मात्र बर्‍यापैकी वाट लावली आहे!)

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायझेनबर्ग... Happy

सकाळपासुन आमच्या इथे थंडरस्टॉर्म्.. दुसरा सेट चालु असताना अशी काही कडाडत वीज पडली की लाइट व इंटरनेट कनेक्शनच गेले व पुढची मॅच बघायलाच मिळाली नाही. Sad

तिकडे मॅचमधे जाकोव्हिकपण नादालवर विजेसारखा कोसळलेला दिसतोय. दुसरा व तिसरा सेट एकदमच किरकोळीत घेतलेला दिसतोय.

चला फ्रेंच ओपनमधले नदालचे न भुतो असे पर्व संपले! फेडररसारखा तोही बहुतेक हळुहळु मंदावत होउन निस्तेज होत जाणार या विचाराने वाइट वाटते. सुमंगल....खेळाडुंमधे फारच थोड्या जणांना आपला अस्त होतोय हे समजते व ते स्वतःहुन निवृत्त होतात. बहुतेक जण फेडरर-राफा मार्गानेच जातात हे त्यांच्या चाह्त्यांसाठी खुप क्लेषदायक असते.

राफाचे शरीर पुर्वीइतके फिट वाटत नाही.. थोडा स्थुल व ढेपाळलेला वाटतो त्यामुळे कोर्ट कव्हरेजमधे कमी पडतोय, उलट जाकोव्हिक... जबरदस्त फिट दिसतो.. मी मॅच सुरु व्हायच्या आधीच हे म्हटले होते, खरच जाकोव्हिक डिझर्व्ह्ड टु विन टुडे! ही इज इन सुप्रिंम कंडिशन... बोथ फिजिकली अँड मेंटली! आता यंदाचे फ्रेंच ओपन इज हिज टु लुज!

सशल तुझे व जाकोव्हिकचे मनापासुन अभिनंदन..

थँक्स राफा.. फॉर द १० यिअर्स ऑफ ग्रेट मेमरीज ऑफ युअर ग्लोरिअस,डॉमिनंट अँड अनबिलिव्हेबल टेनिस अ‍ॅट फ्रेंच ओपन... जस फ्रेंच ओपन म्हटले की ख्रिस एव्हर्ट हे नाव महिलांमधे येते. तसे तुझे नाव फ्रेंच ओपन स्पर्धेशी कायमचे जुळले गेल आहे.. आय डाउट इट की आमच्या हयातीत तुझ्याइतका अटर डॉमिनंस या स्पर्धेत आम्हाला बघायला मिळेल. टेक अ बाव राफा...इव्हन इन अ लॉस!

मुकुंद, राफाच्या निरोप समारंभाचं भाषण काय करायला लागलास एकदम ? नक्की जिंकेल परत असा आशावाद ठेवावा! ज्योकोच्या फॅन्ससारखं ज्योको एक मॅच हारल्यावर "आता ग्रँडस्लॅम जिंकण शक्य नाही." अशी भाकितं वर्तवून मोकळं होऊ नये. Wink

ज्योकोचे अभिनंदन! पहिले दोन सेट रॅली फार मोठ्या झाल्या बहुतेक. स्कोर अपडेट होता होत नव्हता.

आता काही लोकांना वाटतय की मरे जिंकणार म्हणे फ्रेंच ओपन! Proud

पराग,

>> नक्की जिंकेल परत असा आशावाद ठेवावा!

पीअर्स न्यूबरी नामे बीबीसीचा खेळवार्ताहर म्हणतो की राफा या अडचणीवर काहीतरी उपाय काढेल. त्यातून कदाचित एखादं फ्रेंच ओपन विजेतेपद हाती पडेलही. पण तो तोडगा अल्पजीवी असेल. एकदम पटेश.

आ.न.,
-गा.पै.

हार्डलक राफा...

त्याचे वय बघता तो अजून नक्की खेळेल.. पण दुखापतींनी ग्रस्त झाला नाही तर अजुन जिंकेल..

योग्य वेळी रिटायरमेंट घेणे फार महत्त्वाचे आहे.. नाहीतर पुढे काय होते त्याची कितीतरी उदाहरणे आहेत..

मला असं वाटतंय आता सेरिना आणि स्टेफी ह्यांच्यातल्या ग्रँड स्लँ टायटल्स् मध्ये लवकरच फक्त २ चा फरक रहाणार ..

मला सेरिना अजिबात आवडत नाही खरंतर .. पण तरिही मानलं पाहिजे तिला ..

काय जिद्द! (पण ही लॅरी विल्यम्स् सारखी जिद्द वाटते ..)

सरेना आणखी एक थ्रीसेटर जिंकली. ह्या स्पर्धेत चौथ्यांदा एका सेटच्या पिछाडीवरून जिंकली ती. भारी आहे !

पराग.. राफा आणी फेडरर च्या बाबतीत आशावाद आणी वास्तवता यात खुप मोठी दरी मला दिसते. कितीही कटु असले तरी एज इज द एनिमी इन स्पोर्ट्स हे सत्य नाकारता येत नाही.

बाय द वे.. गेल्या १२ वर्षात रॉजर फेडरर व राफाशिवाय ही स्पर्धा कोणीच जिंकली नव्हती.. हा एक तपाचा काळ एवढा मोठा आहे की ९९ % लोकांच्या आठवणीतही नसेल की या दोघांच्या आधी ही स्पर्धा जिंकणारा शेवटचा खेळाडु.. अर्जेंटीनाचा अननोन टेनीसपटु... गॅस्टॉन गॅडिओ हा होता.. Happy

I am retired hurt from French Open 2015 Wink फायनल्स बघेन वेळ झालाच तर.

हे पहा तुम्ही मला शीण घालवायला एक स्पा सर्टिफिकेट आणि आमच्या #२ घोड्याला योग्य त्या दुकानाचं कुपॉन पाठवून द्या.

french open matches kuthlya channel var ahet Sad ani vel kay aahe ???

आता सध्या टेनिस चॅनल वर आहे .. ११ नंतर एन् बी सी वर असणार आहे .. बहुतेक तेव्हा रेकॉर्डींग दाखवतील .. उद्या पासून एन् बी सी वरच असेल ..

लाईट कमी पडायला लागला म्हणे ..

उरलेली उद्या ..

आधीच एका ज्योको न आवडणार्‍या टेनिस फॅनकडून मेडिकल टॅम्प्लीज् घेतल्यामुळे मरे ची लय बिघडली असं ऐकलं .. आता तर काय!!! Happy

ज्योकोबा पोचले अंतिम फेरीत.

बायकांच्या स्पर्धेत सेरेना जिंकला. तब्ब्येत बरी नसतांनाही जी जिगर दाखवली त्याबद्दल त्याचं अभिनंदन.

-गा.पै.

बघताय का कोणी ?
चांगली सुरू आहे मॅच. पहिला सेट स्टॅन थोडक्यात हरला. स्टॅन बॅकहँड जबरी मारतो आहे !

ज्योको नेहमीप्रमाणे मोक्याचे पॉईंट एकदम प्लॅनने खेळून मिळवतो आहे.

पराग .. बघतोय. जबरी चालली आहे मॅच.

खर म्हणजे वॉवरींका जबरी खेळतोय. कसले हेवी फोरहँड्स आणी पॉवरफुल वन हँडेड सब्लाइम बॅक हँडेड शॉट्स मारतोय सबंध मॅचभर!

वॉवरींका २ सेट्स टु १! ३-३ चौथ्या सेटमधे.

फ्रेंच ओपन फायनलचा रविवार सार्थकी लागतोय!

वॉव! कसला जबरदस्त खेळला वॉवरिंका! ही डिझर्व्ह्ड टु विन!

बिचारा जाकोव्हिक बहुतेक मॅकेन्रो,कॉनर्स्,बेकर, एडबर्ग्,सँप्रास सारखा फ्रेंच ओपनपासुन वंचितच राहणार असे दिसतेय!

जाकोव्हिकला वाटत असेल.. मी करायचे तरी काय ही टुर्नामेंट जिंकायला? फायनली नदालला हरवले या वर्षी.. पण नेमका सब्लाइम फॉर्ममधला वॉवरिंका फायनलमधे आडवा आला:(

लेंडल आणी विलँडर नंतर वॉवरिंका तिसरा खेळाडु की ज्याने दोन्ही ....ज्युनिअर व सिनिअर फ्रेंच ओपन टुर्नामेंट जिंकल्या.

अमेझिंग मॅच !!! स्टॅन सगळ्याच बाबतीत वरचढ ठरला. ज्योकोने सगळं काही करून बघितलं शेवटचा सेटमध्ये.
(मला ज्योको आणि मरेच्या विंबल्डन फायनलची आठवण झाली. त्यातही ज्योकोने असच सगळं काही करून बघितलं होतं.) ज्योकोचा ड्रॉप शॉट्सचा प्लॅन सुरूवातीला चालला नंतर मात्र स्टॅनने काउंटर प्लॅन आणला.
स्टॅनने बॅकहँड आणि सर्व्हिस अ फा ट केल्या !!! शॉट सिलेक्शन भनाट होतं. कोर्ट कव्हरेजही राफाची आठवण करून देणारं होतं.

ज्योकोबद्दल वाईट वाटलं. पण तो जिद्दी आहे. येईलच पुढच्या वर्षी परत! ह्या स्पर्धेतली ही एकच मॅच पूर्ण पाहिली पण वेळा अगदी सार्थकी!

सेरेनाचेही अभिनंदन. बायांमध्ये अजूनही सेरेनाच्या खेळाला उत्तर नाही तर !

सशल, करीयर स्लॅम भल्याभल्यांना जमलं नाही. पण प्रयत्न सोडू नका. Wink

त्या बॅकहँडची कन्सिस्टन्सी बघून राजूदादांनेही मिरका वहिनींच्या पदराचा शेव तोंडात घातला असेल. दिवाळीतल्या रॉकेटसारखा कायम ईकडे तिकडे मिसफायर होत असलेल्या बॅकहँडची बंदूक कुठे काही ठिगळ-जोड मलम लावून नीट करून मिळेल का ते बघितले पाहिजे. स्वीडीश आयकीयाच्या दुकानात एक काही धड मिळत नाही.

मिरका वहिनींचे आणि स्टॅनभाऊजींचे आधीच जोरदार बिनसले असल्या कारणाने मांडवली करावी लागेल लवकरच.

अरे काय हे यंदा पग्या कुठे हरवलाय. फ्रेंच ओपन सुरु होऊन ४ दिवस झाले तरी २०१६ चा धागा नाही आला अजून.. फेडेक्स नाहीये यंदा तरी पण ही अवस्था... का म्हणूनच ही अवस्था...

Pages