फ्रेंच ओपन टेनिस - २०१४

Submitted by Adm on 23 May, 2014 - 01:49

यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २५ मे रोजी सुरु होत आहे.

पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. शिवाय गेल्या वर्षभरात प्रभावी कामगिरी केलेला 'स्टॅन द मॅन' आणि डेव्हिड फेरर कसे खेळतात ह्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. यंदाचा क्ले सिझन नदाल साठी संमिश्र गेलेला असल्याने नदाल त्याच्या 'घरच्या' कोर्टवर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असेल.

शारापोव्हाने क्ले सिझनमधली एक स्पर्धा जिंकून आशा निर्माण केल्या आहेत. अर्थात सेरेना, ना ली वगैरेंचे कडवे आव्हान तिच्यासमोर असेलच.

मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा .. मी विचार करतच होते के अजून बीबी कसा नाही आला त्याबद्दल ..

तर सर्व खेळाडूंनां शुभेच्छा .. जीतेगा भाई जीतेगा! Wink

मरेला काय झालं? जोकर / नदाल्/स्टॅन यांच्यातच चुरस. फेडरर सध्या संसारात मग्न असल्याने नो चान्स!

सेरेना, व्हिनस, फेडरर जिंकले..
सेरेना व्हिनस तिसर्‍या फेरीत भिडण्याची शक्यता आहे..

सशल, ज्योकोला अवघड ड्रॉ आलाय म्हणे.. !

>> सशल, ज्योकोला अवघड ड्रॉ आलाय म्हणे.. !

आताशा सगळंच अवघड असतंय म्हणे .. असू दे .. हम नारा वोही लगाएंगे "जीतेगा भाई जीतेगा " Wink

निओ स्पोर्ट्सच्या चॅनलवर आहे. पॅकेज घ्यावं लागेल एअरटेल डिशसाठी तरी, फ्री नाहीये अगदी अल्ट्रा पॅकवरसुद्धा

आणि धक्कादायक निकालांची सुरुवात झालेली आहे !
दुसरी मानांकित ना ली पहिल्याच फेरीत गारद !
तृतिय मानांकित 'स्टॅन द मॅन' ही पहिल्याच फेरीत गारद .. तो नदालच्य हाफमध्ये होता.. त्यामुअळे त्यांची सेमी फायनल व्हायची शक्यता होती..

इर्रानी, मरे ह्यांनाही बर्‍यापैकी घाम गाळावा लागला असं दिसतय !

भारतात कुठेच प्रक्षेपण दिसत नाहीये Sad

भारतात निओ वर आहे प्रक्षेपण.. टाटा स्काय वाल्यांचे निओ बरोबर काहीतरी वाजले आहे त्यामुळे तिथे नाहीये सध्या.. कालच फोन झाल्या त्यांच्या सपोर्टच्या माणसा बरोबर..

जोको महान आहे.. कालचा एक व्हिडिओ आहे चेपु वर.. पाऊस पडत असताना त्यानी बॉल बॉय बरोबर मारलेल्या गप्पा दाखवत आहेत....

हिम्या.. अच्छा.. गेल्यावर्षी होतं कारण निओ टाटा स्कायवर..

सशल.. वेबसाईट वर आर्टीकल आहे ज्योकोच्या ड्रॉबद्दल.. हे बघ.. तिकडेच वाच डिटेलमध्ये..

http://www.rolandgarros.com/en_FR/news/articles/2014-05-23/2014052314008...

काल फारच दंगा झाला... विल्यम्स भगिनी किरकोळीत बाहेर गेल्या स्पर्धेच्या..

शारापोवाला जिंकायची फुल संधी...

हो ना.. विल्यम्स भगिनींचा धक्कादायक पराभव..
ली पण नाहीये.. शारापोव्हाने ढिसाळपणा केला नाही पाहिजे फक्त ! सर्ब्स पैकी कोणी जिंकलं तरी चालेल.

कालचे नदालचे हायलाईट्स पाहिले.. दाखवले ते पॉईंट्स मस्त मारले एकदम..

ज्योकोचा बॉल बॉय बरोबरचाव व्हिडीयो मस्त होता.. Happy

शारापोव्हाला इतक्यात आधीची एटिपी पण जड गेलीय लोक्स. अझारेंका, हॅलेप , वगैरेंना विसरू नका..:)
आमचेकडे विकांताशिवाय मॅचेस पाहाणं कठीण (याचा किनार्याशी संबंध नाही :P)

यंदा मॅचेस बघायलाच मिळत नसल्यामुळे टीआरपी घरलाय चांगलाच.

अझारेंका नाहीये यंदा..

हालेप(४), क्विटोव्हा(५), यंकोविच(६), शारापोव्हा(७), केर्बर (८), इर्रानी (१०), एव्हानोविच (११).. इतक्या आहेत अजून तरी शिल्लक.. तिसर्‍या फेरीत कोणकोण बाहेर पडतय ते बघायचं..

पुरुष एकेरीत अजून तरी विषेश धक्के बसलेले नाहीयेत.. वावरिंका सोडल्यास.. पहिल्या ८ पैकी.. तो एकटाच बाहेर गेलाय..

ह्म्म... स्टोसुर-शॅरापोव्हा मॅच चांगली होईल.
Makarovaचा गेम् पण कधीतरी आवडला होता. मुलींच्या सिंगल्समध्ये एकंदरीत चुरस आहे आणि कोण जिंकेल ते आता सांगणं कठीण आहे.

दिवसा टेनिस चॅनेलने कब्जा केलेला दिसतोय.

स्टोसुर्/शेरापोव्हा मस्त झाली. ठोसरबाईंचा पाय दुखावलाय पण पहिला सेट घेतला होता मग शेरापोव्हाने पुरी जिम्मेदारी के साथ खेलके Happy

फेडरर तिसर्‍या फेरीत पराभूत !! >> चौथ्या फेरीत बाद झाला..पाचव्या सेट मध्ये फारच नर्व्सस दिसत होत....

गुल्बिस मस्त खेळला...Latvia देशाचा प्रथमच खेळादू बघतोय मी Happy

हो बरोबच.. चौथ्या फेरीत..
तिसर्‍या काय आणि चौथ्या काय.. बाद झाला ना.. Wink

मरेला पण खूपच फाईट मारावी लागली असं दिसतय.. पाचवा सेट १२-१० !

त्सोंगाची मात्रा चालली नाही वाटतं काल..

Pages