यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २५ मे रोजी सुरु होत आहे.
पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. शिवाय गेल्या वर्षभरात प्रभावी कामगिरी केलेला 'स्टॅन द मॅन' आणि डेव्हिड फेरर कसे खेळतात ह्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. यंदाचा क्ले सिझन नदाल साठी संमिश्र गेलेला असल्याने नदाल त्याच्या 'घरच्या' कोर्टवर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असेल.
शारापोव्हाने क्ले सिझनमधली एक स्पर्धा जिंकून आशा निर्माण केल्या आहेत. अर्थात सेरेना, ना ली वगैरेंचे कडवे आव्हान तिच्यासमोर असेलच.
मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.
स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..
एवढे मोठे रेस्टरूम ब्रेक घेऊन
एवढे मोठे रेस्टरूम ब्रेक घेऊन एकदम जादुची कांडी फिरवल्यागत एनर्जी आल्यासारखं खेळायचं हे स्पोर्ट्स(वु)मनशिपला धरून आहे का? एवढी सिनिअर प्लेअर असून नवख्या अपोनंटसमोर असे नाटकी टॅकटिक्स? तिसर्या सेटमध्ये सलग दोन डबलफॉल्ट करतांना ती आता मॅच सोडून देणार असे वाटत होते.
हालेप किती काम आणि कंपोज्ड खेळतेय मानलं पाहिजे तिला.
शारापोवा जिंकली
शारापोवा जिंकली
मानलं पोवाबाईंना! तिसऱ्या
मानलं पोवाबाईंना! तिसऱ्या सटात दुहेरी चूक करून ४-४ ला बरोबरीत आल्यावर पुढच्याच डावात हालेपची सेवा खंडित करतांना जबऱ्या जोश दाखवला. तो आणि पुढचा डाव दोन्हीत हालेपला एकही गुण मिळाला नाही!
-गा.पै.
Well done Sharapova.....But
Well done Sharapova.....But Healp makes her shout louder and louder till the end....
चमन, >> हालेप किती काम आणि
चमन,
>> हालेप किती काम आणि कंपोज्ड खेळतेय मानलं पाहिजे तिला.
सहमत. आज ना उद्या थोरली धडक (ग्रँडस्लॅम) मारणार ती!
आ.न.,
-गा.पै.
जिंकली का? यंदा एक पण मॅच
जिंकली का? यंदा एक पण मॅच बघितली नाही.
गा.पै., थोरली धडक काय म्हणताय एकदम पेशवे- पेशवीणबाई खेळताहेत असं वाटतं.
रश्यन अँथेम चं सुरूवातीचं
रश्यन अँथेम चं सुरूवातीचं म्युझिक चालू होतं तेव्हा किती डोलत होती ती .. त्यांच्यात अगदी सावधान नाही पण स्तब्ध उभं रहायचं नसतं का?
मी मिसल. आता पुनर्प्रक्शेपण
मी मिसल. आता पुनर्प्रक्शेपण बघेन.
जिंकली शारापोव्हा जिंकली
जिंकली शारापोव्हा जिंकली
कोई देख रैला है की नय? आमचा
कोई देख रैला है की नय?
आमचा घोडा सुरूवातीला थोडा लकी होऊन पुढे धावला पण आता जरा कठिण दिसतंय ..
९ वं !!!! ग्रेट.. पहिल्या सेट
९ वं !!!! ग्रेट..
पहिल्या सेट नंतर आज वेगळा इतिहास घडणार की काय असं वाटलं ! पण जबरी !!!
सगळी मॅच बघता नाही आली पण शेवटच्या सेटचा काही भाग बघितला... !
नदाल जिंकला? पहील्यांदाच
नदाल जिंकला?
पहील्यांदाच आमची दोन्ही माणस जिंकली
शुगरपोव्हा आणि नदाल
पराग +१ जबरी जिद्दीने खेळला
पराग +१
जबरी जिद्दीने खेळला नदाल. मस्तच एकदम!
त्यांच्यात अगदी सावधान नाही
त्यांच्यात अगदी सावधान नाही पण स्तब्ध उभं रहायचं नसतं का? >> सशल.. ते सावधान/स्तब्ध रहाणं बहुतेक फक्त भारतीय राष्ट्रगीताच्यावेळीच असतं.
नदाल भारी खेळला राव. काय
नदाल भारी खेळला राव. काय माणुस आहे, ९वे अजिंक्यपद. पहिला सेट सोडल्यास जोको काही त्याला मात देईलसे वाटले नाही.
सशल, मला WHO नामक चॅनलवर दिसली मॅच. इएसपीएन२ वर काहीतरी वेगळेच चालू होते. विंबल्डन कुठे दिसेल? माझ्याकडे मिडिआकॉमचे पॅकेज आहे त्यात विंबल्डनपुरते दोन आठवड्यासाठी एखादे चॅनल घेता येईल का बघितले पाहिजे.
टण्या , आधीच्या राउंड्स ते
टण्या , आधीच्या राउंड्स ते ESPN2 वर दाखवत होते पण ह्या वीकेण्ड्स च्या त्यांनीं NBC वर दाखवल्या .. सॉरी फॉर द राँग इन्फो ..
नाडोबांनी एकाच थोरल्या धडकेत
नाडोबांनी एकाच थोरल्या धडकेत (फ्रेंच ओपन) ९ विजेतेपदं मिळवली. असा विक्रम मार्टिना नवरातिलोव्हाने विम्बल्डनच्या बाबतीत केला आहे. पुढली काही वर्षे ही स्पर्धा जिंकतीलच ते. हा विक्रम तोडणं अवघड होणारे.
-गा.पै.
जोको शेवटी चोक होतो का?
जोको शेवटी चोक होतो का? (गेल्या वर्षी विम्बल्डनलाही दोघे असेच बरोबरीने खेळत असताना एकदम अचानक हरलाच!)
नदाल जिंकला याचा अर्थात आनंदच आहे. जोको टफ फाईट देत होता. आम्ही आता पाचवा सेट होणार या तयारीत असताना अचानक डबल फॉल्टवर हरलाच?? याचं मात्र वाईट वाटलं. (नदाललाही त्याने स्वतः मारलेल्या विनरवर जिंकायला जास्त आवडलं असतं का? :))
नदाल खूपच ईमोशनल झाला होता. आता पंधरावं जेतेपद विम्बल्डनचं!
या नदालला काय म्हणायचे तरी
या नदालला काय म्हणायचे तरी काय आता? गेल्या दहा वर्षात ९ वेळा फ्रेंच ओपन चँपियन? धिस इज सिंपली माइंड बॉगलींग! तेही फेडरर व जाकोव्हिक सारख्यांची काँपीटिशन असताना!
दोघांचाही खेळ कालच्या फायनलमधे.. ते खेळु शकतात त्याच्यापेक्षा.. कमी दर्जाचा झाला असे मला जाणवले.. कदाचित ते दोघेही आतापर्यंत ४२ वेळा एकमेकांशी खेळुन खेळुन पार दमले असावेत. त्यांच्यातला प्रत्येक सामना म्हणजे ह्युमन एंड्युअरंसचा अंत बघणारा असतो.. ४-४ तास.. ५-५ तास किंवा ६-६ तास ते एकमेकांशी ४२ वेळा झुंजले आहेत.. आय थिंक दॅट हॅज टेकन अ टोल ऑन बोथ दिज प्लेयर्स. नाहीतर पहिल्या सेटमधे ३-४ असा स्कोर असताना स्वतःच्या सर्व्हिस गेम वर नादालने त्याचे हुकुमी असलेले चाबकासारखे बसणारे व एरवी तो लिलया मारु शकत असलेले विकेड फोर्हँड विनर्स त्याने मिस नसते केले व पहिला सेट जोकोला बहाल नसता केला.
तसेच जाकोव्हिकनेही त्याची पहिली सर्व्हिस व अगदी साध्या साध्या व्हॉलीज इतक्या वेळेला मिस नसत्या केल्या.काही काही वेळा त्याने खुपसे पॉइंट ..पुर्वी जसे तो जिवाच्या आकांताने फाइट करायचा.. तसे न करता फाइटशिवाय सोडुन दिल्यासारखे वाटले.
त्याचा अर्थ असा नाही की कालचा सामना अटितटीचा झाला नाही.. कालच्या सामन्यातही त्यांच्यातल्या नेहमी दिसुन येणार्या चुरशीची झलक आपल्याला बघायला मिळाली. पण दुसर्या व तिसर्या सेटमधे जेव्हा नदालचे जबरदस्त इन्साइड आउट फोर्हँड फटके बसु लागले तेव्हाच तो ९ वे विजेतेपद मिळवेल अशी चिन्ह दिसु लागली होती. पण चौथ्या सेटमधे जोकोची सर्व्हिस भेदल्यावर नंतरचा लगेचचा गेम ज्या रितीने नदाल हरला तेव्हा वाटले होते की कदाचित हा सामना पाचव्या सेट मधे जाउ शकतो पण शेवटच्या गेममधे ३०-० असे पुढे असुनही जोकोने शेवटी डबल फॉल्ट करुन अँटीक्लायमॅक्स रित्या सामना गमावला.
जोकोचे खुप वाइट वाटले. त्याने आसवे थांबवायचा खुप प्रयत्न केला पण रोलँ गॅरसवरच्या दर्दी प्रेक्षकांनी त्याला मनापासुन दाद देउन तब्बल ५ मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला व तो आपली आसवे थांबवु शकला नाही. गेल्या ३ वर्षात नदालच त्याच्या व फ्रेंच ओपन विजेतेपदाच्या मधला अडसर ठरला आहे. जोकोच्या डोक्यात त्या वेळेला काय विचार असतील याची कल्पना येउ शकते.
इन माय ओपिनियन जाकोव्हिक डिझर्व्ह्स द फ्रेंच ओपन चँपिअनशिप.. बट अगेन सो लाँग नदाल इज कंपिटिंग अॅट रोलाँ गॅरस... द रोड टु फ्रेंच ओपन टेनिस चँपिअनशिप विल ऑल्वेज गो थ्रु हिम!
मस्त लिहिलं आहेत मुकुंद
मस्त लिहिलं आहेत मुकुंद
दोघांचाही खेळ कालच्या फायनलमधे.. ते खेळु शकतात त्याच्यापेक्षा.. कमी दर्जाचा झाला असे मला जाणवले..>>+१!
जोको सुरेख खेळतो. पण त्याच्याविरुद्ध नदाल असेल, तर माझं पारडं कायमच नदालकडे. तो सुरेख टेनिस खेळतो हा एक भाग. त्या व्यतिरिक्त तो हम्बल, डाऊन टु अर्थही वाटतो. कसले टॅन्ट्रम्स नाहीत, रॅकेट फेकून दे वगैरे नखरे नाहीत. त्याची कामगिरीच बोलते. त्याच्याबद्दल आदर वाटतो तो त्याच्या या गुणांमुळे.
जोको शेवटी चोक होतो का? >>>
जोको शेवटी चोक होतो का? >>> दरवेळी नाही होत खरं.. पण फ्रेंच ओपनमध्ये होतो.. कदाचित कोर्ट आणि त्यावरची नदालची हुकमत ह्यामुळे तसं होत असावं. त्याने नदालला अतिशय चुरशीच्या ग्रँडस्लॅम फायनल्समध्ये हरवलं आहे.. गेल्यावर्षीच्या विंबल्डनबद्दल म्हणत असशील तर ज्योको आणि मरे फायनल होती.. आणि तो दिवस मरेचा होता.. ज्योकोने शक्य ते सर्वकाही करून बघितलं पण मरे कशानेच बधला नाही..
नदाललाही त्याने स्वतः मारलेल्या विनरवर जिंकायला जास्त आवडलं असतं का? >>>> मला नाही वाटत तसं.. कारण शेवटी व्यवसायिक टेनीस आहे.. जिंकण महत्त्वाचं.
आता पंधरावं जेतेपद विम्बल्डनचं! >>>> आमेन !
वा वा नदालच्या विजेतेपदाने मुकुंदला खेचून आणलं इकडे.. मस्त पोस्ट !
मुकुंद, चांगला संदेश.
मुकुंद, चांगला संदेश. विम्बल्डनचंही असंच परीक्षण वाचायला मिळो!
आ.न.,
-गा.पै.
Pages