जिगरबाजांची दुनिया
अनुभव (सप्टेंबर २०१६) अंकात प्रकाशित झालेला लेख
-------------------------------
Don’t be surprised... I will still rise... (रिओ ऑलिंपिकमधे वाजलेलं गीत, केटी पेरी)
अनुभव (सप्टेंबर २०१६) अंकात प्रकाशित झालेला लेख
-------------------------------
Don’t be surprised... I will still rise... (रिओ ऑलिंपिकमधे वाजलेलं गीत, केटी पेरी)
उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.
पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.
अॅथलेटिक्स :
थाळा फेक : विकास गौडा ५८.९९ मी. गोळा फेकून ३५ स्पर्धकांत २८वा.
गोळा फेक : महिला मनप्रीत कौर १७.०६ मीटरच्या फेकीने ३६ स्पर्धकांत २३वी.
८०० मीटर्स : पुरुष : जिन्सन जॉन्सन १मि ४७.२७ ची वेळ नोंदवत २५वा.
२० किमी चालणे : मनीष सिंग १ तास २१.२१ ची वेळ नोंदवत १३वा. अन्य दोन स्पर्धक फाउल केल्याने बाद.
४०० मीटर्स : पुरुष : मोहम्मद याहिया ४५.९५ सेकंदांची वेळ नोंदवत ३१वा
पुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्मा ७.६७ मीटर २४वा
महिलांच्या १०० मीटर्स स्प्रिंटमध्ये द्युती चांद ११.६९ सेकंद ५०वी