Submitted by टवणे सर on 13 August, 2016 - 09:32
3000 मीटर steeple chase मध्ये ललिता शिवाजी बाबर. 2600 मीटर पर्यंत 3-4 नंबर वर. काय मस्त पळत आहे. शेवटची लॅप सुरुऊ आहे. गो ललिता गो.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ललिता अजब पळाली. राष्ट्रीय
ललिता अजब पळाली. राष्ट्रीय विक्रम करून चौथ्या क्रमांकावर आली qualifier heat मध्ये. म हा न.
प्रत्येक हिट मधून पहिल्या 3 स्पर्धक अंतिम फेरीस पात्र होतात. पण पुढचे 6 फास्तेस्ट पण पात्र होणार. त्यामुळे बाबर पुढे पात्र होण्याची अजूनही शक्यता आहे.
हिट3 मध्ये अजून एक भारतीय आहे सुधा सिंघ
बाबर अंतिम फेरीत पोचली
बाबर अंतिम फेरीत पोचली बहुतेक. हिट 1, 2 आणि 3 मधले पहिले 3 स्पर्धक सोडल्यावर उरलेल्या स्पर्धकात ती पहिली आहे. उरलेल्यातले 6 जलद धावपटू अंतिम फेरीस पात्र होणार
क्वालिफाईड झाली
क्वालिफाईड झाली
सहसा दीर्घ पल्ल्याचे धावपटू
सहसा दीर्घ पल्ल्याचे धावपटू 3, 5, 10 किमी करत पुढे हाफ अन फुल मॅरेथॉन धावायला लागतात. ललिता बाबर मॅरेथॉनने सुरुवात करून 3000 मी स्टेपलचेस कडे वळली आहे. नो वंडर तिच्याकडे शेवटच्या लॅपला 400मीटर स्प्रिंट मारण्याची ताकद आहे.
बेस्ट ऑफ लक ललिता
http://indianexpress.com/sports/rio-2016-olympics/lalita-babar-india-300...
ह्याला म्हणायची तयारी आणि एकाग्रता
बोल्टची पहिली हीट झाली.
बोल्टची पहिली हीट झाली. अपेक्षेप्रमाणे पहिल्यानंबरवर!
मो फारा आज 10000 मीटरमध्ये
मो फारा आज 10000 मीटरमध्ये धावणारा. मो (मोहम्मद) झाटोपेक नंतरचा सर्वोत्कृष्ट 5/10 किमी धावपटू गणला जातो.
आणि मो जिंकला. Galan Rupp चा
आणि मो जिंकला. Galan Rupp चा धक्का लागून पडल्यावर देखील मो 10000 मीटर जिंकला. केवळ अशक्य. 27 मिनिटे आणि काही चेंज. काय ग्रेस होती धावण्यात.
या वेळी देखील 3 आणि 4 नंबर इथियोपियाचे. मागल्या ऑलिम्पिक मध्ये बिकेले बंधूंना फाराने मागे टाकले होते.
एनबीसीचा समालोचक म्हणाला त्याप्रमाणे मो फारा आता ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट्स मध्ये आहे. पावो नुर्मि, एमिल झाटोपेक, हेली गाब्रिसेलासी, केनिनीसा बिकेले आणि आता मो फारा!!!
Galan आणि मो दोघेही सालाझारचे शिष्य. Galan Rupp वर आणि सालाझारवर डोपिंगचे आरोप झाले होते मागल्या वर्षी मात्र त्यातून काही ठोस निष्पन्न झाले नाही. रूप या वेळी मॅरेथॉनमध्ये उतरतोय. रूप जर मॅरेथॉन जिंकला तर सालाझारचा ग्रेटनेस पुन्हा एकदा अधोरेखित होईल.
Bolt takes the gold!!! आता
Bolt takes the gold!!! आता 200मीटर अन 4X100रिलेमध्ये सुवर्ण मिळवले तर सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन स्पर्धात सुवर्ण मिळवण्याचा विक्रम होईल. तसेच याचा अर्थ तो ज्या स्पर्धात उताराला त्या प्रत्येक स्पर्धेत त्याला सुवर्ण मिळून तो अजिंक्य असेल. गो बोल्ट गो! असा खेळाडू पाहण्याचे आपले नशीब आहे
पुरुष 400 मीटर. अजून एक
पुरुष 400 मीटर. अजून एक जबरदस्त शर्यत झाली. वेड वाँ निएकर्कने मायकल जॉन्सनचा 99 पासूनचा अबाधित विक्रम मोडला. आऊटर लेनामधून ब्लाइंड पोझिशनने पळत त्याने शर्यत जिंकली. अमझिंग रन
स्नॅपचॅट अॅप्लिकेशन मधे
स्नॅपचॅट अॅप्लिकेशन मधे ९-१० सेकंदचा एक व्हिडीओ तुम्ही बनवू शकतात.
पण
बोल्ट त्यात स्वतःची एक पुर्ण रेस समाविष्ट करू शकतो.
बोल्टची १०० मिटर पाहिली काल.
बोल्टची १०० मिटर पाहिली काल. भारी रेस होती. सुरुवतीला वाटलं ह्यावेळी गोल्ड जातं की काय. पण भारी पळला तो!
बोल्ट ची १०० मी फायनल भारी
बोल्ट ची १०० मी फायनल भारी होती पण त्याची क्वालीफायर तर अजून मस्त होती. त्याला माहिती होतं की आरामात जिंकणार तो. त्यामुळे एकदा आघाडी घेऊन दोन्हीकडे पाहीले आणि जी काय मस्त स्माईल दिली ती मस्त होती अगदी. असं वाटत होतं की भाऊ आरामात पळतो आहे आणि खरी चीज फायनल करता राखून ठेवली आहे.
४०० मी चा विक्रम मोडलेली शर्यत पण सुंदर झाली.
त्यामुळे एकदा आघाडी घेऊन
त्यामुळे एकदा आघाडी घेऊन दोन्हीकडे पाहीले >>> हे त्याने लंडनच्या फायनलला पण केलं होतं.
जी काय मस्त स्माईल दिली ती
जी काय मस्त स्माईल दिली ती मस्त होती अगदी. असं वाटत होतं की भाऊ आरामात पळतो आहे आणि खरी चीज फायनल करता राखून ठेवली आहे.
>>
अगदी अगदी. सैफ अली खानची कुठल्या तरी ( बहुधा माचो) लंगोटीची जाहिरात आहेना 'बडे आराम से 'ट्याग लाइनची . तो जसा निवान्त डुलत डुलत पळतो अगदी तस्सेच...
८०० मीटरमध्ये आज डेविड
८०० मीटरमध्ये आज डेविड रुडिशा. हा ८००मीटरचा बोल्ट आहे, एलिगंट रनर
मो फाराने डोळ्याचे पारणे
मो फाराने डोळ्याचे पारणे फेडले. मो पुन्हा एकदा १०,००० आणि ५,००० चा विजेता.
५०००मध्ये काय शेवटची ४००मीटरची स्प्रिन्ट होती. अमेझिंग.
मो इज इन द लीग ऑफ ग्रेट्सः पावो नुर्मी, झाटोपेक, हायली गॅब्रेसिलासी, किनिनिसा बिकेले आणि आता मो फाराहा!!!!
५०००मीमध्ये कांस्यपदक विजेता बर्नाड लगाट मॅराथॉन रनर आहे, वय वर्षे फक्त ४१ सिम्पली ग्रेट.
मी २०१४मध्ये डेमॉइन्स हाफ मॅराथॉन पूर्ण केली २:१० मिनिटमध्ये. मी ज्यावेळी फिनिश लाइन क्रॉस केली त्यावेळी फुल मॅराथॉनचा विजेत्यानेपण माझ्या बरोबरीने लाइन क्रॉस केली. म्हणजे मी २१ किमी पळायला जेव्हडा वेळ घेतला तेव्हड्या वेळात हा पठ्ठ्या ४२ किमी पळाला होता. तो बर्नार्ड लगाट. मी एव्हडेच म्हणेन की लाँग अँड मिडल डिस्तन्स रनिंगमधल्या एका ग्रेट धावपटूला जवळून बघण्याचे माझे भाग्य होते.
संपादनः अमेरिकेच्या पॉल चेलिमो या शर्यतीत दुसरा आला होता. पण शर्यत पूर्ण झाल्यावरच्या यादीत त्याला डिसक्वालिफाइड म्हणुन दाखवत होते आणि कारण दिले होते शर्यतीत धक्काबुक्की करण्याचे. मात्र अंतिम यादीत तो पुन्हा दुसरा म्हणुन जाहीर केला गेला आणि लगाट त्यामुळे च्चौथ्या क्रमांकावर गेला
मॅराथॉन [ मग ती पूर्ण असो,
मॅराथॉन [ मग ती पूर्ण असो, हाफ किंवा क्वार्टरही असो ] पूर्ण अंतर धांवणार्यांना मीं मानतो. त्यांचं टायमिंग बघण्याचीही त्याकरतां मला गरज वाटत नाहीतुमाम्हाला सॅल्यूट.
<< म्हणजे मी २१ किमी पळायला जेव्हडा वेळ घेतला तेव्हड्या वेळात हा पठ्ठ्या ४२ किमी पळाला होता >> पळपुट्या कुठचा !!!
बोल्ट म्हणजे ' ट्रॅक अँड फिल्ड 'चं हंसरं, खोडकर व लाडकं बाळच आहे !!
किपचोगे !!! काय ग्रेसफुली
किपचोगे !!! काय ग्रेसफुली पळाला. अमेझिंग रन.
टेक अ बाउ मि. गॅलन रुप. मागल्या ऑलिम्पिकमध्ये १०,०००मीटरमध्ये रजत आणि कारकिर्दीच्या फक्त दुसर्या मॅराथॉनमध्ये ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक. सालाझार बॉइज आर स्टिल शायनिंग.
तिन्ही भारतीय धावपटूंची उत्तम कामगिरी. नितेन्द्र सिंग रावत जवळपास कोसळला शर्यत पूर्ण केल्यावर. गोपी टी. आणि राम खेता २५/२६वे आले बहुतेक. कमेंडेबल.
२ तास १५ मिनीटं व २५-२६ सेकंद
२ तास १५ मिनीटं व २५-२६ सेकंद ही वेळ देऊन. हॅट्स ऑफ
<< किपचोगे !!! काय ग्रेसफुली
<< किपचोगे !!! काय ग्रेसफुली पळाला. अमेझिंग रन.>> +१ ! आणि, स्टेडियममधे आल्यावर 'स्प्रींटींग' करुन दाखवतो !!
<< टेक अ बाउ मि. गॅलन रुप. >> मॅराथॉनला सिल्वर व ब्राँझमधे फक्त कांहीं मीटर्सचंच अंतर ! मानलं त्या रुपलाही !
अभिनंदन तिघांही पदक विजेत्यांचं व कौतुक ही जीवघेणी रेस पूर्ण करणार्या प्रत्येकांचं !
कम्बोडियाच्या ताकिझाकीने
कम्बोडियाच्या ताकिझाकीने शेवटून दुसरा आल्यावर जे आनंदाचे प्रदर्शन केले त्याला तोड नाही. आज तो किपचोगीइतकाच प्रसिद्ध झाला असेल. तो स्वतः एक कॉमेडियन आहे असे समालोचक म्हणत होते. त्याने अंतिम रेषा उजळून टाकली आणि ऑलिम्पिक स्पिरीट काय असते ते दाखवून दिले.
अर्जेन्टिनाचा ब्रुनोने पायात प्रचंड गोळे आले असताना जवळपास शेवटले अर्धे-पाउण किलोमिटर साइडवेज स्टेप्स टाकत पूर्ण केले.
मस्त updates... thanks. आडो,
मस्त updates... thanks.
आडो, ती कुणाची वेळ दिली आहेस?
गोपी आणि खेतारामची वेळ आहे
गोपी आणि खेतारामची वेळ आहे ती.
अरे वा!
अरे वा!
कम्बोडियाच्या ताकिझाकीने
कम्बोडियाच्या ताकिझाकीने शेवटून दुसरा आल्यावर जे आनंदाचे प्रदर्शन केले त्याला तोड नाही>> हा मूळचा जॅपनीज कॉमेडियन आहे. ऑलिंपिक मधे भाग घेण्यासाठी त्याने कंबोडियाची नॅशनॅलिटी घेतली. इकडे थोडीफार टीका पण झाली त्याच्यावर. लंडन ऑलिंपिक च्या वेळेस नॅशनॅलिटी घेऊन १ वर्ष पण झाले नसल्याने त्याला कंबोडिया ला रिप्रेझेन्ट करता नाही आले ते या वेळेस त्याने केले. नेको हिरोशी म्हणून प्रसिद्ध आहे तो. उंची ४ फूट ९ ईंच फक्त
एम्बी, धन्यवाद अधिक
एम्बी, धन्यवाद अधिक माहितीबद्दल. त्याचे आडनाव बघून शंका आलीच होती. पण पठ्ठ्याने फारच एन्जॉय केले
ऑलिंपिक्समध्ये भारताचे खेळाडू
ऑलिंपिक्समध्ये भारताचे खेळाडू चमकदार कामगिरी का करत नाहीत यावर आपण अनेकदा घमासान चर्चा करतो.
भारतीय युवा खेळाडुंच्या दयनीय परिस्थतीवर आलेला हा आजचा लेख
https://indianexpress.com/article/sports/young-athletes-run-out-of-hope-...