'चिरपटोफोबिया'!
निनाद त्याच्या पलंगावर गाढ झोपलेला होता. समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता.