खाली डोकं वर पाय
Submitted by Dr Raju Kasambe on 18 July, 2019 - 11:08
कोल्हा नाही लांडगा नाही
आपला सच्चा मित्र हाय
पक्षी नाही, वटवाघूळ हाय
खाली डोकं वर पाय !!
मायाळू बुजरे निशाचर
गुहेत झाडावर वा फटी-चर
आम्हा सम सस्तन प्राणी हाय
खाली डोकं वर पाय !!
शाकाहारी वटवाघळे
खाती केवळ फळे
मांसाहारी किडे खाय
खाली डोकं वर पाय !!
इको लोकेशनचे तंत्र
अंधारात बघण्याचा मंत्र
रडार सुद्धा फेल हाय
खाली डोकं वर पाय !!
विष्ठेत नत्र आणि स्फुरद
नैसर्गिक कृषी खत
कृत्रिम खते फेल जाय
खाली डोकं वर पाय !!
शब्दखुणा: