फिर वही रात है .....
साधारणतः चाळीसच्या दशकात खांडव्याहून मायानगरी मुंबईत आलेल्या आभासकुमार गांगूली नावाच्या त्या कलंदराने बहुदा रसिकांच्या मनावर तहहयात अधिराज्य गाजवायचं हे ठरवुनच मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. सुरूवात अभिनयक्षेत्रातुनच झाली. १९४६ मध्ये आलेल्या आणि अशोककुमार नायक असलेल्या 'शिकारी' मधुन किशोरदांनी एक अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. अशोककुमारांची इच्छा किशोरदांनी त्यांच्याप्रमाणे अभिनेता बनावे हीच होती. स्वत; किशोरदा मात्र फिल्मी करियरबद्दल फारसे गंभीर नव्हते. १९४८ साली आलेल्या 'जिद्दी' मध्ये संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोरदांना सर्वप्रथम गाण्याची संधी दिली.