भवानी आई भवानी

Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 07:47

शिवतेजाची आग भडकुदे पुन्हा रक्तारक्तात
वादळ उसळुदे सह्याद्रीच्या पुन्हा नसानसांत
हर हर महादेव गर्जना होवुदे पुन्हा रणांगणात
आई भवानी प्रसन्न हो गं जोगवा मागतोय आज ..२..

भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी

दृष्टांचा येथे सुकाळ आला
पापी नजर खिळते इभ्रतीला
या सर्वांचा नाश करण्या
घे अवतार पुन्हा, तू घे अवतार पुन्हा ..२..

भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी

राजा माझा शिवराय भला
घडविले त्यान स्वराज्याला
सफल केल आशीर्वादाला
पावन केल तुला, गं प्रसन्न केल तुला ..२..

भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी

पुत्र शोभला शंभू राजा
मृत्युला न घाबरे सर्जा
धर्माचा अभिमानी राज़ा
जन्म घेवुदे पुन्हा, गं जन्म घेवुदे पुन्हा ..२..

भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी.

- कवी - गणेश पावले
९६१९९४३६३७
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users