भवानी आई भवानी
Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 07:47
शिवतेजाची आग भडकुदे पुन्हा रक्तारक्तात
वादळ उसळुदे सह्याद्रीच्या पुन्हा नसानसांत
हर हर महादेव गर्जना होवुदे पुन्हा रणांगणात
आई भवानी प्रसन्न हो गं जोगवा मागतोय आज ..२..
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
दृष्टांचा येथे सुकाळ आला
पापी नजर खिळते इभ्रतीला
या सर्वांचा नाश करण्या
घे अवतार पुन्हा, तू घे अवतार पुन्हा ..२..
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
राजा माझा शिवराय भला
घडविले त्यान स्वराज्याला
सफल केल आशीर्वादाला
पावन केल तुला, गं प्रसन्न केल तुला ..२..
भवानी आई भवानी, भवानी आई भवानी
विषय:
शब्दखुणा: