बेफिकीर…पण काही क्षणापुरताच
कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच…
तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या कि अबद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुडत बसतो.
मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जगतो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी.