कीर्तीवंत वीरमंत्र
Submitted by गणेश पावले on 14 May, 2015 - 01:51
☼ कीर्तीवंत वीरमंत्र ☼
लढाईस या तयाच्या जरी अंत नाही
कित्येक झाले फितूर तरी खंत नाही
भगव्याशी एकनिष्ठ जो अंश झाला
तया प्रमाण कोणी दूजा राष्ट्रसंत नाही
रणांगनी रक्ताने माखले अंग जरी
शौर्यास ज्याच्या किंचितही भंग नाही
मृत्युस न भीता अवघा रणकंद झाला
तया प्रमाण कोणी दूजा वंद्य नाही
मृत्यूची कधी ना ज्याला खंत वाटे
तोची अमर या भूवरी कुलवंत शोभे
हुंकारातही जयाच्या रणी रंक कापे
तया प्रमाण कोणी दूजा वीरमंत्र नाही
विषय: