संगीत

NCPA, SOI आणि उस्ताद झाकीर हुसैन - ते अविस्मरणीय पाच दिवस

Submitted by आशयगुणे on 4 November, 2015 - 00:28

नमस्कार! ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण-मुंबईच्या NCPA ला जाउन एक अनोखी मैफल आणि त्याची पूर्व-तयारी अनुभवण्याचा योग आला. कलाकार होते उस्ताद झाकीर हुसैन आणि पाश्चात्य ऑर्केस्ट्रा कंडक्टर झेन दलाल.

त्याबद्दल डायरीच्या थाटात लिहिलेले हे अनुभव:

दिवस पहिला - २२ सप्टेंबर

काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

विठठल सापडला

Submitted by नितीनचंद्र on 16 September, 2015 - 04:55

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ।
म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥

आई

Submitted by प्रमोद देव on 13 September, 2015 - 01:32

कालच मातृदिन झाला. आईच्या माहात्म्याबद्दल वेगळं काही सांगावं अशी खरंच गरज नसते कारण प्रत्येक व्यक्तीला तो अनुभव...स्वानुभव असतोच. आईसंबंधी वाटणारी ममत्त्वाची, कृतज्ञतेची भावना व्यक्त करणार्‍या असंख्य कविता आपण आजवर वाचत/ऐकत आलोय.. तशातच माझ्या माहीतीतील, महाजालावरील तीन जणांनी ’आई’वर केलेल्या कवितां माझ्या वाचनात आल्या आणि वाचता वाचता सहजपणाने त्या तीन कवितांना मला ज्या चाली सुचल्या, त्या मी माझ्या आवाजात गाऊन युट्युबवर सादर केलेत...त्याचा दुवा मी इथे देत आहे...आपण ह्या कविता वाचाल आणि ऐकालही अशी मी आशा करतो.

विषय: 
शब्दखुणा: 

प्रेरणा देणारी गाणी सुचवा , आधीचे गप्पा पान वरील पोस्ट डिलीट होत होत्या म्हणून नविन धागा

Submitted by joshnilu on 8 September, 2015 - 23:57

हिंदीत व मराठीत काही प्रेरणात्मक इंस्पिरेशनल गाणी आहेत
मला अश्या गाण्यांची लिस्ट करायची आहे
कृपया तुम्हाला आठवणारी गाणी व चित्रपट नाव टाका

उदा. बार बार हा बोलो यार हा --लगान

अशी गाणी आपला मूड ऑफ झाल्यावर कोणतेही ऐकले तरी
आपण प्रेरणा घेवून अजुन जोमाने काम करू

प्रेरणा देणारी गाणी सुचवा

Submitted by joshnilu on 8 September, 2015 - 13:28

हिंदीत व मराठीत काही प्रेरणात्मक इंस्पिरेशनल गाणी आहेत
मला अश्या गाण्यांची लिस्ट करायची आहे
कृपया तुम्हाला आठवणारी गाणी व चित्रपट नाव टाका

उदा. बार बार हा बोलो यार हा --लगान

अशी गाणी आपला मूड ऑफ झाल्यावर कोणतेही ऐकले तरी
आपण प्रेरणा घेवून अजुन जोमाने काम करू

तडका - नाना,मकरंद

Submitted by vishal maske on 11 August, 2015 - 00:20

नाना मकरंद

या दुष्काळलेल्या माणसांना
त्यांनी माणूसकी वाटलेली आहे
या मातीतल्या त्या लेकरांची
मातीशी नाळ ना तुटलेली आहे

शेतकर्‍यांचे अश्रु पाहून
मन त्यांचं तळमळलं आहे
सरकारला जे कळलं नाही
ते नाना,मकरंदला कळलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - फिल्मी कोडं

Submitted by vishal maske on 3 August, 2015 - 08:52

फिल्मी कोडं

वेग-वेगळे डायलॉग घेत
तीच-तीच विचारपुस सुरू आहे
सोशियल मिडीया झिंगला पार
मात्र शंकेचा ताठ मेरू आहे

सांगणारालाच काय सांगायचंय
हे एक न सुटणारं तिडं आहे
कटप्पाने बाहूबलीला का मारले
हे कित्तेकांना पडलेलं कोडं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

"मनातल्या भावकळ्या" - पुस्तक प्रकाशन व गाण्यांचा कार्यक्रम

Submitted by हिम्सकूल on 13 July, 2015 - 04:13
तारीख/वेळ: 
20 July, 2015 - 08:00 to 10:55
ठिकाण/पत्ता: 
म.ए.सोसायटीचे सभागृह - बाल शिक्षण शाळेचे आवार - मयूर कॉलनी - कोथरुड, पुणे.

पुण्यातील ज्येष्ठ संगीतकार श्री. म.ना. कुलकर्णी ह्यांनी नुकतीच वयाची ८५ वर्षे पूर्ण केली, त्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या "मनातल्या भावकळ्या" ह्या आत्मकथन पर पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दि. २० जुलै २०१५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता बालशिक्षणमंदिर शाळेच्या आवारातील म.ए.सोसायटीच्या सभागृहात पद्मश्री पं. सुरेश तळवलकर ह्यांच्या हस्ते व प्रसिद्ध संगीतकार श्री. रवि दाते ह्यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे पुस्तक 'राजहंस प्रकाशन'ने प्रकाशित केले आहे.

ह्या कार्यक्रमाचे सर्वांना हार्दिक निमंत्रण..

प्रांत/गाव: 

कोंडल्याचे गाणे....

Submitted by लाजो on 12 July, 2015 - 21:58

कोंडल्याचे गाणे...

----

विशेष सुचना १:

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू---- या परंपरागत गायल्या जाणार्या भोंडल्याच्या गाण्यावरून प्रेरणा मिळाली...

चाल अर्थात त्याच गाण्याची Happy

माहित नसेल तर ऐकण्यासाठी मला वि पु करा... माझ्या मंजुळ आवाजात रेकॉर्ड करून पाठवेल Happy

----

एक तडका मारू बाई दोन तडके मारू
दोन तडके मारू बाई तीन तडके मारू
तीन तडके मारू बाई चार तडके मारू
चार तडके मारू बाई पाच तडके मारू

पाचा तडक्यांचा पुरवठाsss

माळ घाली कवीराजाला

कवीराजाची सुस्साट गाडी
येता जाता कविता पाडी...

कवितांच्या भाराने पिचली जनता

अरे अरे राजा बस तुझी सजा....

Pages

Subscribe to RSS - संगीत