काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कभी बंधन भूला दिया
कभी दामन छुडा लिया
ओ साथी रे.. ए ए ... ए ए ए
कैसा सिला दिया.. ये वफा का, कैसा सिला दिया..
तेरे वादे, वो इरादे.. सबकुछ भुला दिया ये वफा का कैसा सिला दिया..

मै कोई ऐसा गीत गाऊ
के आरझू जगाऊ
अगर तुम कहो..
तुमको बुलाऊ
ये सपने सजाओ
कदम तुम जहा जहा रखो
जमीन को आसमा बनाऊ
सितारों से सजाऊ'
अगर तुम कहो............

सुरुवात बाप्पाच्या गाण्याने करते.

अशी चिक मोत्याची माळ,
होती ग तीस तोळ्याची ग,
चिक मोत्याची माळ होती ग,
तीस तोळ्याची ग.
जसा गणपतीचा गोंडा,
चौरंगी लाल बावटा ग,
गणपतीचा गोंडा,
चौरंगी लाल बावटा ग.

उत्तरा केळकर.

धन्यवाद निनाद. इथे माहिती वाहून नाही जाणार. बरेच जण चांगली लिंक देतात, त्या आधी वाहून जायच्या.

मृदुल करांनी छेडीत तारा,
स्मरते रूप हरीचे मीरा.

सुमनची गाणी चालू आहेत एकापाठोपाठ एक.

दिल ढुंढता है फिर वही,
फुरसतके रात दिन.

९x जलवा channelवर लागलंय. बघतेय.

रंगाबती .. रंगाबती
संबळपुरी फोक कोक स्टुडिओ साठी सोना मोहपात्रा आणि ऋतुराज मोहन्ती यांनी काय गायले आहे. ओडिशातले हे सगळ्यात लोकप्रिय फोक आहे. अवश्य पहा... ऋतुराजने शेवटी शेवटी 'वन्दे उत्कळ जननी 'हे प्रांताला उद्देशून म्हटलेले अतीव सुन्दर....
https://www.youtube.com/watch?v=LY_rMXXuJp8

सगळ्यात हाईट म्हणजे याच गाण्याचा प्ले बॅक वापरून इंजीनीअरिन्गच्या होस्टेलच्या पोरट्यानी जी धमाल केलीय त्याला तोड नाही. अगदी हहपुवा आहे. विशेषतः सोना मोहपात्राची नक्कल करणार्‍या पात्रा ने धमाल केलीये... आधी मूळ गाणे पहा नन्तर ही धमाल....

https://www.youtube.com/watch?v=HDjUE040NWc

रॉहू, रंगाबती नवीन फिल्मसाठी पण वापरलंय (त्यात राधिक आपटे आणी कुणाल कपूर आहेत) मला ते व्हर्जन फारसं आवडलं नाही. पण हे कोक स्टुडिओअमधलं व्हर्जन खास जमलंय.

आता तो दुसरा धमाल व्हीडीओ बघते. Happy

आज ३० सप्टेंबर - ऋषिकेश मुखर्जी यांचा जन्मदिवस.

त्यांचे मला आवडणारे गाणे
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने

मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चूने
सपने, सुरीले सपने
कुछ हँसते, कुछ गम के
तेरी आँखों के साये चुराए रसीली यादों ने
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने

छोटी बाते, छोटी, छोटी बातों की हैं यादे बड़ी
भूले नहीं, बीती हुयी एक छोटी घड़ी
जनम जनम से आँखे बिछाई तेरे लिए इन राहों ने
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने

रूठी रातें, रूठी हुई रातों को मनाया कभी
तेरे लिये मीठी सुबह को बुलाया कभी
तेरे बिना भी तेरे लिए ही दिये जलाए आहों ने
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने

भोले भाले, भोले भाले दिल को बहलाते रहे
तनहाई में तेरे ख़यालों को सजाते रहे
कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख़्वाबों ने
मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने

दुवा: https://www.youtube.com/watch?v=SC8DuvNCjbY

असं वाजवा की
रात गाजवा की
अवसंची पुनव होउ द्या

ढोलकी चित्रपट (ऑगस्ट २०१५)
मानसी नाईक आणि सिद्धार्थ जाधव

यात सिद्धार्थ ढोलकी वाजवतो त्याचा ताल चित्रिकरणा बरोबर जमवला आहे त्याचे कौतुक वाटते.
गाण्यावर मेहेनत घेतली आहे हे जाणवते आहे.
गाण्याचे चित्रिकरण पण आवडले.
मानसी नाईक नेहमी प्रमाणे झकास.

लावणी आवडली आहे

दुवा: https://www.youtube.com/watch?v=L7CqBqeC8rc

दिल ढुंढता है फिर वही,
फुरसतके रात दिन.

अतिशय आवडतं गाणं आहे...

लेकिन चित्रपटातले, आशा आणि सत्यशील देशपांडे यांनी गायलेले, झूठे नैना बोले साची बतिया... हे गाणे आवडते का ?

https://www.youtube.com/watch?v=iTd9JxGjskA

तर मग बिलासखानी तोडी राग ( याच रागावर हे गाणे आधारीत आहे ) नक्कीच आवडेल. पं बसवराज राजगुरु, यांच्या आवाजात हा राग जरुर ऐका. एखादा कलाकार रागाची सुरवात करताना, माझ्यासारखे अज्ञ पहिली काही मिनिटे, कुठला राग असेल, अश्या विचारात पडतात. इथे बसवराजांनी पहिल्या १०/१५ सेकंदातच हा राग अगदी
नेमकेपणाने साकार केलाय. शिवाय या २० मिनिटातला कुठलाही आलाप ऐका, तो खणखणीत याच रागाचे रुप घेऊन येतो. आणि आपली आशा एवढी ग्रेट, कि ती वरच्या गाण्यात नेमके तेच साधतेय.

https://www.youtube.com/watch?v=zppPGaUkd7Q

आणि हा राग आवडला तर मग पं अजय चक्रवर्ती यांच्या आवाजातही ऐका ( हे आपल्या कौशिकीचे बाबा ) अगदी तब्येतीने तासभर गायलाय. पतियाळा घराणे म्हणजे जबरदस्त तैयारी.. ती तर दिसतेच. शिवाय त्यांनी आग्रा घराण्याच्या आणि उस्ताद अमीर खाँ साहेबांच्या पण ताना सादर केल्यात. मध्येच अगदी वेगळ्या सप्तकात गायलेय ( ते कठीण आहे, असे त्यांनीच कबूल केलेय.. ) ३० ते ३२ मिनिटात, अगदी जबरदस्त असा अलंकार सादर केलाय.

https://www.youtube.com/watch?v=zt6HcuoJq8g

<<
शिवाय त्यांनी आग्रा घराण्याच्या आणि उस्ताद अमीर खाँ साहेबांच्या पण ताना सादर केल्यात.
>>

? आग्रा?

हर्पेन ,सहेला रे...ऐकताना जीव हल्लख होऊन उडू लागतो पाकोळीगत... पण मला पं.रघुनंदन पणशीकरांनी गायलेला थोडा हळव्या आवाजातला जास्त आवडतो लिंकसाठी धन्यवाद!

Pages