काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://youtu.be/__KG6oBihtU?si=jJ_Bp2ONFLUqdDYP

राम नामवेमो (कन्नड आहे) - अत्रेय सिस्टर्स ( खरं तर मोठी बहिणच गाते - रील्स मध्ये छोट्या बहिणीचा नाचही खुप गोड आहे )

आज यु ट्यूबने हा व्हिडियो दाखवला.

खरा तो प्रेमा - मंजुषा पाटील - तबला संगत झाकिर हुसैन

झाकिरला वाजवताना पाहून ऐकून श्वास आपसूक रोखला गेला.

पुढे शौनक अभिषेकी आणि राहुल देशपांडेंनी गायलेली नाट्यगीते आहेत.

आता तीट.
सुबोध भावेला काय झालं? नाट्य संगीताच्या गाण्याचं सूत्रसंचालन करायचं म्हणून इतके हातवारे? आणि एकच प्याला दारुबंदीवर? गडकरीमास्तरांनी खाली येऊन काम उपटायला हवेत.
खरा तो प्रेमा मध्ये पुढे "नभी जनहितरत भास्कर तापत" हे योग्य जागी विराम घेऊन कोणी म्हटलंय का?

खरंतर हे गाणं अमां साठी म्हणावसं वाटतंय म्हणजे गाणं ऐकूण त्यांची खूप आठवण येतेय पण.. त्या जिथे कुठे असतील तिथे सेलिब्रेशन मोड मधेच असतील याची खात्री आहे.

सर्वाना छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या शुभेच्छा.
https://youtu.be/z1-_dZEfsvc?si=z51waohqMXD77JkL

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
https://youtu.be/6biwAXtPKyQ?si=6gRvy18p1M3IeFfo

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
https://youtu.be/rTUjC5Kv0c8?si=CupJXWxc-O6ZZheH
हे गाणं गायलंय सुंदरच पण याचे लिरिक्स अप्रतिम लिहिलेत वैभव जोशी यांनी. लिहायचा मोह होतोय ,लिहितेच.

तू आहेस ना
तू आहेस ना
तू आहेस ना
जरी हाथ हाथी तुझा
धुक्यासारखा स्पर्श हा
पुन्हा एकदा सांग ना
आहेस ना
कधी शारदा तू
कधी लक्ष्मी तू
कधी भाविनी वा कधी रागिणी
सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी
तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर
अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना
तुझी थोरवी काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना
तू आहेस ना
अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता
अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता
तुला फक्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा
तुला फक्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा
तू आहेस ना
तू आहेस ना
तू आहेस ना
(आहेस ना)
(आहेस ना)
तू आहेस ना (आहेस ना)
(आहेस ना)

साहिर !

तकरार करतांनाही विनम्रता कशी तर :

अगर न हो ना-गवार तुमको, तो ये शिकायत क़ुबूल कर लो

दोन्ही गाणी बेहद्द पसंतीची ❤

Pages