काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://youtu.be/__KG6oBihtU?si=jJ_Bp2ONFLUqdDYP

राम नामवेमो (कन्नड आहे) - अत्रेय सिस्टर्स ( खरं तर मोठी बहिणच गाते - रील्स मध्ये छोट्या बहिणीचा नाचही खुप गोड आहे )

आज यु ट्यूबने हा व्हिडियो दाखवला.

खरा तो प्रेमा - मंजुषा पाटील - तबला संगत झाकिर हुसैन

झाकिरला वाजवताना पाहून ऐकून श्वास आपसूक रोखला गेला.

पुढे शौनक अभिषेकी आणि राहुल देशपांडेंनी गायलेली नाट्यगीते आहेत.

आता तीट.
सुबोध भावेला काय झालं? नाट्य संगीताच्या गाण्याचं सूत्रसंचालन करायचं म्हणून इतके हातवारे? आणि एकच प्याला दारुबंदीवर? गडकरीमास्तरांनी खाली येऊन काम उपटायला हवेत.
खरा तो प्रेमा मध्ये पुढे "नभी जनहितरत भास्कर तापत" हे योग्य जागी विराम घेऊन कोणी म्हटलंय का?

खरंतर हे गाणं अमां साठी म्हणावसं वाटतंय म्हणजे गाणं ऐकूण त्यांची खूप आठवण येतेय पण.. त्या जिथे कुठे असतील तिथे सेलिब्रेशन मोड मधेच असतील याची खात्री आहे.

सर्वाना छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या शुभेच्छा.
https://youtu.be/z1-_dZEfsvc?si=z51waohqMXD77JkL

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
https://youtu.be/6biwAXtPKyQ?si=6gRvy18p1M3IeFfo

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
https://youtu.be/rTUjC5Kv0c8?si=CupJXWxc-O6ZZheH
हे गाणं गायलंय सुंदरच पण याचे लिरिक्स अप्रतिम लिहिलेत वैभव जोशी यांनी. लिहायचा मोह होतोय ,लिहितेच.

तू आहेस ना
तू आहेस ना
तू आहेस ना
जरी हाथ हाथी तुझा
धुक्यासारखा स्पर्श हा
पुन्हा एकदा सांग ना
आहेस ना
कधी शारदा तू
कधी लक्ष्मी तू
कधी भाविनी वा कधी रागिणी
सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी
तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर
अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना
तुझी थोरवी काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना
तू आहेस ना
अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता
अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता
तुला फक्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा
तुला फक्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा
तू आहेस ना
तू आहेस ना
तू आहेस ना
(आहेस ना)
(आहेस ना)
तू आहेस ना (आहेस ना)
(आहेस ना)

साहिर !

तकरार करतांनाही विनम्रता कशी तर :

अगर न हो ना-गवार तुमको, तो ये शिकायत क़ुबूल कर लो

दोन्ही गाणी बेहद्द पसंतीची ❤

https://youtu.be/w_EQg4TO1Nc?si=uVY6OXYwRUz1mqsT गाणं रिक्रीएट करण्याचा चांगला प्रयत्न आहे पण ओरिजनल ची सर नाही , ओरिजनल मस्तच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे उगाच रॅप ,वाढीव शब्द टाकून वाट लावली नाहीये.

https://www.youtube.com/watch?v=q37zko-COUM

मूळ एला फिट्झ्जेराल्ड आणि हे दोन्ही आलटून पालटून ऐकते आहे. मला गाण्यापेक्षा शब्द कांकणभर जास्त आवडले

A strawberry moon, blueberry sky
Polka dot stars shining on high
Every thing's right
Oh, what a night for love

A lavender breeze, summer perfume
Sycamore trees, roses in bloom
Every thing's right
Oh, what a night for love

रिंकू राजगुरू चं नृत्यकौशल्य - https://www.instagram.com/reel/DRWUJV0Dw1r/?igsh=d2xyaHlvZGd1azk2
ड्रेस सुंदर आहे .रिंकू आशिष ने शिकवलंय त्या प्रमाणे करतेय ,कधी कधी तिचा चेहरा एक्स्प्रेशन लेस (मक्ख) असतो इथेही तसाच वाटतोय .पण तिने काहीही केले तरी आपल्याला बुवा आवडते ती.

त्या निमित्ताने जुनं ओरिजनल गाणं पहिल्यांदा पाहिलं .नूतन गोड दिसते.कमाल एक्सप्रेशन्स. https://youtu.be/S_MUtM85BUA?si=JxywCSpFYuH5ojbm

वरच्या गाण्यात रिंकूपेक्षा आशिषच जास्त गोड आणि expressive दिसतोय! रिंकूच्या चेहर्‍यावरची माशीदेखील हलत नाहिये. सैराटची आर्ची हीच का असा प्रश्न पडतो आहे.

नूतन तर आहाहा.. क्या कहना!

सिमरन, ऐकलं आणि पाहिलं. Happy
नूतन आता पहिल्यापेक्षा आवडू लागली आहे. आजीला मधुबाला पेक्षा वहिदा आणि नूतन आवडायच्या.
ते का आता समजतं.
निगाहे मिलाने को गाण्याचे सुरूवातीचे पीसेस ऐकताना कधीही पान खाये सैय्या हमार हे गाणं सुरू होईल असं वाटतं.

हो मलापण असंच वाटलं ते कव्वाली टाईप असल्यामुळे असेल. मी नुतनची फक्त गाणी आणि काही नंतरचे पिच्चर पाहिलेत मेरी जंग ,कर्मा वगैरे. खरे जुने ब्लॅक अँड व्हाईट पिच्चर पाहायला हवेत फक्त चांगली प्रिंट हवी.

जुने ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट बघायचा प्रयत्न केला. पण स्टोरी खूपच घिसीपिटी असते. नंतरच्या रंगीत युगात पण खलनायक / खनायिकांमुळे होणारे समज गैरसमज मग शेवटच्या रीळात कुणी तरी आत्महत्या करायला जाणे आणि त्याच्य / तिच्या मागे सर्वांनी धावत जाऊन नंतर सगळे गैरसमज निराकरण होणार हे इतके छापील कथानक असते कि ते सिनेमे गाणी आणि क्लिप पुरतेच बघायला आवडतात. काही काही अपवाद सोडून.
चलती का नाम गाडी / पडोसन इ. दिल एक मंदीर आणि दिल अपना हे दोन पाहीले होते एव्हढ्यात. ते थोडे वेगळे होते.

Pages