प्रकाशक शोधताना!
प्रत्येकच लेखकाने आपलं लेखन, कवींनी आपल्या कविता खूप मनापासून केलेल्या असतात. किंबहुना बऱ्याचदा त्यांच्यातील प्रतिभेनं हे सारं लेखन उत्स्फूर्तपणे कागदावर (किंवा आजकाल संगणकावर) उतरवलेलं असतं. पुढे हे लेखन विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक इत्यादींकडे पाठवल्यावर अनेकदा त्यास प्रसिद्धीही मिळालेली असते. मग या आपल्या लेखनाचं पुस्तक व्हावं असं साहजिकच आपल्या मनात येतं आणि मग सुरु होतो प्रकाशकाचा शोध.