शास्त्रीय संगीताच्या श्रोत्यांची बदललेली मानसिकता
Submitted by आशयगुणे on 31 December, 2014 - 01:17
मानसशास्त्रात भावनिक आत्मजाणीव (emotional self awareness) हा एक मोठ्या प्रमाणावर विचार होणारा विषय आहे. या विषयात एखाद्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या विशिष्ट भावना आणि त्यांच्यामुळे होणारे परिणाम याचा अभ्यास होतो. विशिष्ट भावनांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होतो का, आपल्या एकंदर वागण्यावर काही परिणाम होतो का हेदेखील यात अभ्यासले जाते. ह्या विषयाच्या अभ्यासात असे आढळले आहे की, समोर आलेल्या परिस्थितीला एखादी व्यक्ती दोन पध्दतींनी सामोरी जाते. एक म्हणजे ती व्यक्ती अति शीघ्र पद्धतीने प्रतिक्रिया देते ज्याला शब्द आहे react करते.