“मैत्री” ही नागरिकांची स्वयंस्फूर्त संस्था आहे. देणगीदारांकडून पैसा उभा करून आणि प्रत्यक्ष सहभागातून “मैत्री”चे अनेक उपक्रम चालू असतात. त्यातला एक “मेळघाट मित्र” कुपोषणाच्या विरोधातील उपक्रम आहे.
“मैत्री” च्या आणखी एका उपक्रमाची सुरुवात यावर्षीपासून होत आहे.
नमस्कार!
मला शैक्षणिक उपयोगासाठी एक अॅन्ड्रॉईड अॅप बनवुन हवे आहे. त्यामध्ये साधारण १० जीबी पर्यन्त माहिती साठवली जाईल. पिडीएफ , ऑडिओ, व्हिडिओ अश्या स्वरुपामध्ये माहिती द्यायची आहे.
वर्गवार व विषयवार फोल्डर्स असावेत. फार किचकट डिजाईन नसावी. अशी अपेक्षा आहे.
सदर अॅप हे विद्यार्थी व पालकांना शक्यतो मोफत द्यायचे आहे, त्यामुळे त्यानुसार बजेट आहे.
किती दिवस लागतील व किती खर्च येईल त्याबाबत क्रुपया त्या क्षेत्रातील जाणकारांनी विचारपुस / इमेल द्वारे संपर्क करावा.
धन्यवाद!
गणेशोत्सवाची नांदी लागताच लेकीकडुन गणपती कधी रंगवायचा अशी विचारणा झाली होती.
२ चित्रे होती त्यामुळे शाळेची आठवड्याची सुट्टी संपायला मदत झाली.
नमस्कार मंडळी !
सालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू झाले आहे/ होत आहे त्याची माहिती देत आहे.
जून महिन्यामध्ये अमरावती येथे आपण गावमित्रांचे प्रशिक्षण व नियोजन शिबीर घेतले. त्या शिबीरात पुढील वर्षभर काय काय करायचे याची आखणी आपण केली. त्याच्या अभ्यासाचा भाग शोभाताईंनी तयार करून गावमित्रांना सांगितला व त्याप्रमाणे त्यांची तयारी करून घेतली.
नमस्कार,
हि कल्पना जेव्हा मी "रंगरेषाच्या देशा" हा विषय पाहिला तेव्हाच मला सुचली.
प्रत्येक चित्र एकएकटी अशी मी कुठे ना कुठे पाहिलेली व मनात भरलेली(नेमकी हिच पोझ आणि असेच सादरीकरण असे पाहिलेले नाही).
पण कृष्ण हा मला नेहमीच मोहवतो आणि त्याच्या अनुषंगाने मीरा. आतावर मी "भक्ती" ह्या विषयावर मीरेचीच रेखाटणे केलीत. विषय पाहून हिच कल्पना सुचली आणि त्यावरचे हे माझे अतिशय आवडते गाणे.
सांवरे रंग राची राणाजी......
हा माझा अगदी पहिला-वहिला प्रयत्न आहे चित्र काढण्याचा. चित्र काढण्याची अजिबात आवड नसल्यामुळे शाळेत जे आवश्यक होते ते कसेबसे काढून किंवा कधी बहिणीकडून काढून घेऊन मी वेळ मारुन नेत असे.
पण एका मासिकावर हा 'बाप्पा' पाहिला आणि काढावेसे वाटले.
साध्या पेंसिलीने काढून फॅबर कॅसल क्रेयॉनने रंगवले आहे .
ममोच्या सॅटीनची फुलं या एकाच धाग्याने कमाल केली. एकदा हात वळायला लागला की आता नवं काय करावं याचा किडा स्वस्थ बसू देईल तर शप्पथ... बाप्पांच्या आगमनासाठी काय करावं नेमकं, हे सुचत नव्हतं खरंतर. पण निव्वळ फुलं वगैरे करून तर झाली होती, म्हणून तो विचार बाजू केला आणि म्हटलं, चला, कुणीच यापूर्वी न केलेले
सॅटीनचे बाप्पाच बनवूया आणि लागले कामाला.