दुसरे बाप्पा आज शाळेत जायच्या आधी सकाळी रंगवायला काढले. शाळेतून आल्यावर झाले रंगवून आणि बापाने न कंटाळता अपलोड केले तर दिसतील रात्रीपर्यंत.
गणेशोत्सवाची नांदी लागताच लेकीकडुन गणपती कधी रंगवायचा अशी विचारणा झाली होती.
२ चित्रे होती त्यामुळे शाळेची आठवड्याची सुट्टी संपायला मदत झाली.
नमस्कार मंडळी,
’मायबोली गणेशोत्सव २०१६’साठी घेऊन आलो आहोत आपल्या छोट्या दोस्तांच्या आवडीचा उपक्रम! यावर्षी सगळीकडे ऑलिंपिकची धूम होती, बच्चेकंपनीनंही मन लावून बरेचसे खेळ पाहिले आहेत. आपण भारतानं जिंकलेल्या पदकांचा आनंद साजरा करणार आहोत 'खेळ'कर बाप्पा रंगवून!
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.