खेळकर बाप्पा - रेवती - वय ५ वर्षे ५ महिने
गणेशोत्सवाची नांदी लागताच लेकीकडुन गणपती कधी रंगवायचा अशी विचारणा झाली होती.
२ चित्रे होती त्यामुळे शाळेची आठवड्याची सुट्टी संपायला मदत झाली.
गणेशोत्सवाची नांदी लागताच लेकीकडुन गणपती कधी रंगवायचा अशी विचारणा झाली होती.
२ चित्रे होती त्यामुळे शाळेची आठवड्याची सुट्टी संपायला मदत झाली.
ब : बटाटा (उकडलेले)
ल : लाह्या (साळीच्या/धानाच्या)
म : मूग (मोडवलेले)
धणे, मिरे, बडीशोप, लाल मिरची भाजून केलेली ओबडधोबड पूड, चीज क्युब्ज ,मीठ, चाट मसाला, तळण्याकरिता/शेलोफ्राय करायला तेल.
कृती : मूग कढईत पाच मिनीटे वाफवून घ्यावे. लाह्या पाण्यात टाकून लगेच रोळीत काढून ठेवाव्या. बटाटा कुस्करुन घ्यावा. मूग बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात चीज सोडून सगळे जिन्नस नीट एकत्र करुन घ्यावे. पारी करुन त्यात चीज क्युब ठेवून बॉल बनवावा. तळावा किंवा आप्पे पात्रात शेलो फ्राय करावा . फोटोत दाखवलेल्या प्रमाणात जिन्नस घेतल्यास दहा बॉल्स होतात.
घटक पदार्थ :
म : मखाणे
ब : बदाम
ल : लाल भोपळा
लाल भोपळ्याच्या बिया, कन्डेन्स मिल्क, वेलदोडा, चमचाभर तूप , खोबऱयाचा कीस
कृती : लाल भोपळा किसून ध्या. मखाणे तुपावर भाजून घेवून व बदाम एकत्र पूड करुन घ्या. थोडंस तूप टाकून किस कोरडा होईपर्यंत परतून घ्या त्यात मिल्क, बिया घालून मिश्रण कोरड होईपर्यंत परता. थंड झाले की रोल बनवा व खोबऱयाच्या किसात घोळवून सजवा.
टीपा : खूप सोपी कृती व झटपट होणारी आहे. मखाण्या ऐवजी रवा वापरता येईल. बिघडण्याला वाव नाही.
Don Bosco-सिनियर केजी
आवड्ता छ्न्द : नाचणे (कसेही,कोळी नाच ,थोडा भरतनाट्यम येतोय क्लास लावल्यामुळे)
shriya :
कुस्ती खेळताना थोडी माती लागते... ( )
"तू..तू जा इथून", आकाश कानावर हात ठेवून किंचाळला. त्याच्या किंचाळीनं त्याच्या बाजूच्या बेडवर झोपलेल्या सुजयलाही दचकून जाग आली. घाबरून त्यानं आधी लाईट लावला. समोरचं दृश्य पाहून त्यालाही घाम फुटला.
आकाश कोपऱ्यात पाय दुमडून अंगाचं मुटकुळं करून बसला होता. घामानं तो नखशिखांत भिजला होता. भेदरलेली नजर एका जागी स्थिर राहत नव्हती, सतत भिरभिरत होती. कानावर हात गच्च दाबून धरलेले होते.
नमस्कार,
बाप्पा चे चित्र आल्यापासून गडबड होती रंगवायची, आता घरचा बाप्पा गेल्यावर रंगवले...बाप्पा जाण्याने डोळ्यात येणारे पाणी यामुळे कमी झाले..
चित्रात दिसणारा स्टार आणि स्माईली बाप्पा खुप खुप आवडल्यामुळे दिला आहे.. आमच्या शाळेत आमच्या बाई (मॅम) देतात
धन्यवाद
स्वधाची आई
मंडळी, ह्या वर्षीची पा़कृ स्पर्धा डोक्याला खूपच चालना देणारी आहे. म य ब ल ह्या मायबोलीच्याच आद्याक्षरांपासुन सुरु होणारे कमीत कमी तीन घटक पदार्थ वापरुन पदार्थ करायचा आहे. संयोजकांच्या ह्या कल्पनेचे खूप खूप कौतुक . मी खूप विचार करुन पॅनकेक सँडविच हा पदार्थ तयार केला आहे. बघा वाचुन आवडतो का ते
मुख्य घटक: बीट, लाल भोपळा आणि मैदा
साहित्य : पॅनकेक साठी
एक वाटी मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, लोणी, चिमुट भर मीठ , एक चमचा साखर आणि एक वाटी होल दुध
नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः। नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः ॥
विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे । भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक॥
मंगलमूर्ती मोरया !!
घरोघरी गणरायांचं आगमन झालेलं आहे. बाप्पाचा नैवेद्य, आरत्या आणि पाहुण्यांची लगबग यांतून थोडासा वेळ काढा. तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची प्रकाशचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं, हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.
नमस्कार!
आपल्या मायबोलीवर वेगवेगळी कलाकौशल्यं अवगत असणारी भरपूर कलाकार मंडळी आहे. गणेशोत्सव हा सर्व कलागुणांचा उत्सव! या वर्षी मोठया मायबोलीकरांसाठी घेऊन आलो आहोत 'रंगावली श्रीगणेश'. या उपक्रमात भाग घेण्यासाठी ’मूर्त किंवा अमूर्त स्वरूपातील श्रीगणेश’ या विषयावर स्वतः एक रांगोळी काढायची आहे. रांगोळीसाठी रांगोळीचे रंग, शिरगोळा, फुले, धान्य, डाळी, पाण्यावरची रांगोळी इ. काहीही प्रकार वापरू शकता.
उपक्रमाविषयी -
१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
नमस्कार मंडळी,
’मायबोली गणेशोत्सव २०१६’साठी घेऊन आलो आहोत आपल्या छोट्या दोस्तांच्या आवडीचा उपक्रम! यावर्षी सगळीकडे ऑलिंपिकची धूम होती, बच्चेकंपनीनंही मन लावून बरेचसे खेळ पाहिले आहेत. आपण भारतानं जिंकलेल्या पदकांचा आनंद साजरा करणार आहोत 'खेळ'कर बाप्पा रंगवून!
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.