तोषोनि मज द्यावे पसायदान हे - टीना

Submitted by संयोजक on 22 September, 2015 - 13:37

ममोच्या सॅटीनची फुलं या एकाच धाग्याने कमाल केली. एकदा हात वळायला लागला की आता नवं काय करावं याचा किडा स्वस्थ बसू देईल तर शप्पथ... बाप्पांच्या आगमनासाठी काय करावं नेमकं, हे सुचत नव्हतं खरंतर. पण निव्वळ फुलं वगैरे करून तर झाली होती, म्हणून तो विचार बाजू केला आणि म्हटलं, चला, कुणीच यापूर्वी न केलेले
सॅटीनचे बाप्पाच बनवूया आणि लागले कामाला.

पण मग नुसत्या बाप्पावर तरी कसं समाधान होईल माझं? त्याला पण कदाचित फक्त यावर मला गप्प बसू द्यायचं नसेलच, म्हणून मग डोक्यात एक आणखी कल्पना आली. 'फ्रेम कम वॉलपिसची'. अगदी पहिला प्रयत्न! त्यामुळे जरा उन्नीस-बीस वाटलं तरी 'गणपती बाप्पा मोरया' म्हणायचं आणि कर्म करत राहायचं अस ठरवून केलं तयार...

फोटोरूपात साहित्य, कृती देतेय -

१. मध्यभागी सर्वांत खाली चिमटे आहेत. पाकळ्या तयार करताना, जाळताना कामी येतात. तसंच ती छोटूशी पाकळी बोटाच्या चिमटीत येत नाही, तेव्हा पकडायला पण खूप मदत होते.

Teena1.JPG

२. मोठ्या रजिस्टरच्या पुठ्ठ्याचा बेस म्हणून वापर केला तरी चालेल अथवा माऊंट बोर्ड वापरा. मी माझ्या रफ डायरीला तो मान दिलाय स्मित. त्याला कव्हर घालतो तसं हँडमेड पेपरचं कव्हर घातलं.

Teena2.JPGTeena3.JPG

३. सॅटीनच्या लेसच्या पाकळ्या बनवून त्या पुठ्ठ्यावर रचायला सुरुवात केली.

Teena4.JPGTeena5.JPG

४. आता त्यावर बाप्पांची सॅटीनच्या पाकळ्यांनी तयार केलेली सोंड चिटकवली. पहिले लांब असलेली डावी बाजू, त्यानंतर उजवी. फिनिशिंगसाठी त्या पाकळ्या पहिलेच चिटकवून मग तिला सोंडेच्या आकारात बसवली. त्यामुळेआकार छान देता आला आणि हवा तिथे त्या पाकळ्यांवर दाब पडला.

५. डोळा, कान, मुकुट करत करत बाप्पांचा चेहरा पूर्ण केला.

Teena7.JPG

६. बाजूने कुंदनची रेष तयार केली.

Teena8.JPG

७. उरलेला संपूर्ण भाग लाल रंगाच्या पाकळ्यांनी गच्च भरला.

आणि हे फायनल प्रॉडक्ट सादर करतेय... टाडाssssssssss..

Teena9.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

___/\___

Pages