ममोच्या सॅटीनची फुलं या एकाच धाग्याने कमाल केली. एकदा हात वळायला लागला की आता नवं काय करावं याचा किडा स्वस्थ बसू देईल तर शप्पथ... बाप्पांच्या आगमनासाठी काय करावं नेमकं, हे सुचत नव्हतं खरंतर. पण निव्वळ फुलं वगैरे करून तर झाली होती, म्हणून तो विचार बाजू केला आणि म्हटलं, चला, कुणीच यापूर्वी न केलेले
सॅटीनचे बाप्पाच बनवूया आणि लागले कामाला.
हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे
.
सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच 
प्रचि १.

प्रचि २.

मी बनवलेल कार्ड


सध्या खुप कामात आहे. त्यामुळे कचर्यातून कला मालिकेचे पुढचे भाग जरा लांबले आहेत. तोपर्यंत हा आधी केलेला टी सेट. ३ डी क्विलींगचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे कामात सफाई फार नाहिये.

>रिकामपणाचे उद्योग <
"रचनाशिल्प" पासुन स्फुर्ती घेऊन.....

