अधून मधून कसल्याश्या सुरसुर्या येतात. आणि मग असं काहीतरी करत बसते.
काही वेळा ड्रेसला स्लीव्ज आत नुसते शिवलेले असतात. जर तो ड्रेस स्लीवलेस वापरला तर या स्लीव्ज तश्याच रहातात. या पिशवीचा तळचा भागासाठी या स्लीव्ज वापरल्या आहेत.
ही पिशवी जुन्या कुर्त्याच्या घेरापासून बनवली आहे.
आत स्पंज असल्याने आकार चांगला टिकला आहे.
जुन्या सोफा कव्हरातले तुकडे उरले होते. त्याची ही पर्स.
थ्री डी टी सेट ला भरभरुन दिलेल्या प्रतिसादासाठी खुप धन्यावाद !
खास छोट्या दोस्तांसाठी ही आहे छोटुशी बाहुली
सध्या खुप कामात आहे. त्यामुळे कचर्यातून कला मालिकेचे पुढचे भाग जरा लांबले आहेत. तोपर्यंत हा आधी केलेला टी सेट. ३ डी क्विलींगचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे कामात सफाई फार नाहिये.
एके ठिकाणी बारश्याला जाताना हे दोन फ्रॉक आणि एक छोटे ब्लॅन्केट टाईप दुपटं असं शिवून घेऊन गेले.
पूर्वी शिवलेल्या बेबी फ्रॉकातलं कापड उरलं होतं, त्यालाच चिकनच्या कापडाचा योक/बॉडी लावली. आणि वर रुंद सॅटिन पट्टीचा बो लावून टाकला. हे दोन्ही फ्रॉक साधारणपणे १ वर्षापर्यंतच्या मुलीला येतील.
फ्लॅनेलच्या कापडाचं छोटं ब्लॅन्केट टाइप दुपटं शिवलं आणि त्याला लाल सॅटिन पट्टीचे काठ लावले.
>रिकामपणाचे उद्योग <
"रचनाशिल्प" पासुन स्फुर्ती घेऊन.....
रद्दी काढल्यावर त्यात काही जुनी मॅगझीन्स् सापडली. मग काय, लगेच कापाकापी करून हा सेट बनवला.
मधल्या पायर्यांचे फोटो काढायचे राहून गेले. त्यामुळे या वेळी फक्त कृती देत आहे.
साहित्य :-
आमच्या घरात पेपर वाचून झाल्यावर जागेवर ठेवण्यावरून नेहमी वादावादी होते. एके दिवशी नेटवर हा बॉक्स पाहिला. लगेच पसरलेले पेपर गोळा करून ५-६ बॉक्सेस बनवले. आता ह्यांचा उपयोग रद्दी, लेकाने गोळा केलेला त्याचा खजिना, खेळणी, लॉन्डी बॅग अश्या वाटेल त्या गोष्टी ठेवण्यासाठी होतो आहे.
साहित्य :-
वर्तमानपत्र
गोंद
बोन फोल्डर किंवा स्टिलची पट्टी
हा बॉक्स म्हणजे एक फोटो अल्बम आहे. पण आपापल्या आवडीनुसार सजावटीत बदल करून ह्याचे ग्रिटींग कार्ड वगैरे बनवता येऊ शकते.
साहित्य :-
खालील आकाराचे कागद
बॉक्स साठी
१० १/२" x १० १/२ "
९"x ९"
७ १/२ " x ७ १/२"
झाकणासाठी
६ १/४" x ६ १/४"
कात्री
गोंद
पट्टी
पेन्सील
कृती :-