हस्तकला
हॅन्डमेड फ्रेम्स
गेल्या काही दिवसांपासून ऑफिसमधे काम करता करता मी फोटोशॉपमधे काहीतरी प्रयोग करायला शिकलो होतो. आंतरजालावर काही दुवे मिळाले, ते पाहून पाहून थोडेसे प्रयोग करुन बघितले; थोडंफार जमायला लागलं होतं. मग काय, ब-याचशा फोटोंना प्रयोगाचे उंदिर बनवून टाकले आणि सुरु केलं काम! जमायला लागल्यावर उत्साह वाढलेलाच होता. त्यामुळे काही फोटो नविन इफेक्ट देऊन बनवले.
मी केलेले ओरीगामी बॉक्सेस
सासुबाईंच्या ६०व्या वाढ्दिवसाला केलेला चिरोट्यांचा गुलदस्ता, वेलदोड्यांची माळ आणि साखरफुटाण्यांचा हार
गणपती बाप्पा मोरया
बेबी फ्रॉक
अधून मधून बाळंतविडे किंवा कधी स्वतासाठी , पुतणीसाठी, लेकीसाठी टॉप/कुर्ती असं काही शिवत असते. अगदीच शिवणाची सुरसुरी आली की काही नाही तर गेला बाजार(?) पिशव्या तरी शिवतेच!
कधी कॉट्सवुलचं कापड आणून छोटी ब्लँकेट्स शिवते.
तर असंच कुणाकुणाला काही प्रसंगाने द्यायला हे फ्रॉक शिवले.
साधारण एक ते दीड वर्षाच्या मुलीसाठी शिवले आहेत.
माझे कुडत्यावरील भरत काम ..
"वारली चित्र " ग्रामीण आदिवासी जीवनाची ओळख करुन देतात..मी या माध्यमाचा वापर भेटकार्ड ,भित्तीचित्र्,हँडमेड पेपर्, लाकडाची पट्टी,फेब्रिक पेंटिंग मधे साडी,कुडत्यावर्,हातरुमालांचे कोपरे,टेबलक्लॉथ्,चादर वगेरे वर केला आहे.इथे मी कुडत्यावर साधा धावदोरा घालुन वारली डिझाईन केले आहे.पण मला माणसांची चित्रं नको होती त्यामुळे इतर चित्रांचा वापर केला आहे.तसेच "उरलेल्या" दोर्यांचाच उपयोग करायचा होता. .
१]हे भरतकाम चालु असताना--
क्रोशाची स्ट्रॉबेरी पर्स
काय बर नवीन बनवावे ? याचा मी गुगल वर शोध घेत असताना ही स्ट्रॉबेरीच्या आकाराची पर्से मला दिसली.मी पाहता क्षणी ह्या पर्सच्या प्रेमात पडले आणि कधी एकदा ही पर्स बनवते असे मला झाले.
तुम्हाला पण ही पर्स निश्चितच आवडेल.
एनव्हलप्स
परवा लेकीच्या खजीन्यातून ३/४ पाकिट मिळाली मुंजीला देण्यासाठी. तिच्या म्हणण्या प्रमाणे नेहमीच्या बोअर पाकिटातून देण्यापेक्षा ह्या पाकिटात पैसे घालून दे.
मला पण नेहमी पेक्षा ,वेगवेगळ्या आकारातल्या पाकिटातून भेट देण्याची कल्पना आवडली आणि घेणार्यालाही खुपच आवडल्याची पोचपावती फोनवरून मिळाली ( विशेषतः लहान मुलांना )
आपल्याला वाटणार्या कचर्या पासून -( पत्रिकांचे मागचे कोरे कागद, हँडमेड पेपर ,दोरे, टिकल्या असल्या काही बाही वस्तूंपासून हाताने, चिकटवून बनवलेली (अर्थातच लेकीने) ही काही. )
तुमच्याकडच्याही छोट्यांच्या काही आयडीया असतील तर जरुर टाका.
माझे भरतकाम..
मी दोन कुडत्यांवर एकसारखे डिझाईन घेवुन भरतकाम केले.कोयरी चे डिझाईन आहे.पैकी एका मूगी / हिरव्या कुडत्यावर दोन मुख्य रंग गुलाबी व पिवळा वापरला.रेशीम २ पदरी घेतले.डिझाईन कसुती ने म्हणजे धाव-दोर्या च्या टाक्याने भरले..दुसरा कुडत्याचे कापड पिवळा[गोल्डन]-हिरवा अशा फिरत्या रंगाचे आहे.त्यावर पिवळे[गोल्डन] चौकोनही आहेत.यावर पिवळ्या रेशमाच्या ३ पदरी दोर्यानी तेच कोयरीचे डिझाईन घेतले आहे.डिझाईन छापण्यासाठी स्टेन्सिल वर काळ्या मार्कर पेन ने डिझाईन काढले आणि पिवळ्या व पांढर्या कार्बन ने ट्रेस केले.
वारली कुडते :--