हॅन्डमेड फ्रेम्स

Submitted by आदित्य चंद्रशेखर on 25 April, 2012 - 02:30

                    गेल्या काही दिवसांपासून ऑफिसमधे काम करता करता मी फोटोशॉपमधे काहीतरी प्रयोग करायला शिकलो होतो. आंतरजालावर काही दुवे मिळाले, ते पाहून पाहून थोडेसे प्रयोग करुन बघितले; थोडंफार जमायला लागलं होतं. मग काय, ब-याचशा फोटोंना प्रयोगाचे उंदिर बनवून टाकले आणि सुरु केलं काम! जमायला लागल्यावर उत्साह वाढलेलाच होता. त्यामुळे काही फोटो नविन इफेक्ट देऊन बनवले.
              फोटो बनवल्यावर फ्रेम्स बनवणंही ओघाने आलंच! बाजारात चौकशी केल्यावर कळालं की आपल्याला हव्या तशा फ्रेम्स आणि हवं तसं बजेट यांचा काही मेळ बसत नाहीये, मग थोडासा विचार करुन आणि जुजबी साहित्य बाजारातून विकत आणून स्वत:च फ्रेम्स बनवल्या. बघा जमल्या आहेत का?
1.jpg2.jpg3.jpg

(टीप: फोटोसुद्धा फोटोशॉपमधे संपादित केलेले आहेत)

गुलमोहर: 

सुंदर.

यासाठी थर्माकोल, हॅन्डमेड पेपर आणि पुठ्ठा वापरलेला आहे. हे सगळं मटेरिअल वजनाला हलकं असल्याने फ्रेम्सपण खूप हलक्या होतात आणि भिंतीवर लावतांना खिळा ठोकून टांगण्याऐवेजी त्या चिकटवताही येतात.