Submitted by आदित्य चंद्रशेखर on 25 April, 2012 - 02:30
गेल्या काही दिवसांपासून ऑफिसमधे काम करता करता मी फोटोशॉपमधे काहीतरी प्रयोग करायला शिकलो होतो. आंतरजालावर काही दुवे मिळाले, ते पाहून पाहून थोडेसे प्रयोग करुन बघितले; थोडंफार जमायला लागलं होतं. मग काय, ब-याचशा फोटोंना प्रयोगाचे उंदिर बनवून टाकले आणि सुरु केलं काम! जमायला लागल्यावर उत्साह वाढलेलाच होता. त्यामुळे काही फोटो नविन इफेक्ट देऊन बनवले.
फोटो बनवल्यावर फ्रेम्स बनवणंही ओघाने आलंच! बाजारात चौकशी केल्यावर कळालं की आपल्याला हव्या तशा फ्रेम्स आणि हवं तसं बजेट यांचा काही मेळ बसत नाहीये, मग थोडासा विचार करुन आणि जुजबी साहित्य बाजारातून विकत आणून स्वत:च फ्रेम्स बनवल्या. बघा जमल्या आहेत का?
(टीप: फोटोसुद्धा फोटोशॉपमधे संपादित केलेले आहेत)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अरे वा! छान आहेत फ्रेम्स.
अरे वा! छान आहेत फ्रेम्स. कश्या केल्या? ते लिहिणार का?
सुंदर.
सुंदर.
छान आहेत
छान आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यासाठी थर्माकोल, हॅन्डमेड
यासाठी थर्माकोल, हॅन्डमेड पेपर आणि पुठ्ठा वापरलेला आहे. हे सगळं मटेरिअल वजनाला हलकं असल्याने फ्रेम्सपण खूप हलक्या होतात आणि भिंतीवर लावतांना खिळा ठोकून टांगण्याऐवेजी त्या चिकटवताही येतात.
मस्तच:)
मस्तच:)
खुपच छान कल्पना आहे या
खुपच छान कल्पना आहे या फ्रेम्स बनविण्याची..
फ्रेम्स सुदंरच बनविल्या आहेत
फ्रेम्स सुदंरच बनविल्या आहेत व फोटोशॉपमधे संपादित केलेले फोटोसुद्धा एकदम छान आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान कल्पना ...........
छान कल्पना ...........
धन्यु सृष्टी!
धन्यु सृष्टी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख केल्यात फ्रेम्स.
सुरेख केल्यात फ्रेम्स.
धन्यु रूनी पॉटर!
धन्यु रूनी पॉटर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)