चाळीशीत शिरलं की आपल्या आयुष्याचा डाव परत मांडावासा वाटतो (अर्थात, काही सोंगट्या न हलवता.) मग आपल्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींचा आपण शोध घ्यायला लागतो. माझे पण असेच झाले. आणि शोध घेता घेता अचानक एके दिवशी मला माझा आवडणारा पण राहून गेलेला एक छंद अगदी कडकडून भेटला. क्रोशे.
माझ्या पुतणीसाठी मी तयार केलेला सेट
मधल्या पदकाचा क्लोज अप
माझी नविन फ्रेम नुकतिच तयार झाली आहे.आधि सान्गितल्या प्रमाणे केली. comments ची वाट बघते आहे.
मागच्या महिन्यात कोकणात गेलो असताना एक जायंट नारळ मिळाला.
त्याची करवंटी देखील टाकवेना लेकीला ही आणि मलाहीl लेकीने त्या पासून बनवलेला पेन स्टँड
तिच्या दृष्टीने तिने थ्रीडी इफेक्ट दिलाय
हा लेकीने बनवलेला मातीचा सँटाक्लॉज
आज जेवल्यानंतर मोसंबीच्या साली घेउन गायब झालेली लेक बराच वेळ शांत होती म्हणुन काय चाललय हे बघायला गेले तर हे पराक्रम......
डोंगरात उगवणारा सुर्य
घर आणि शेकोटी
(थंडीने पांढरा पडलेला ) मुलगा
मोसंबीच झाड
आणि हा आमचा देखावा तयार
१९८० च्या सुमारास प्रथमच मोठ्या आकारातली क्रॉसस्टीच ची फॅशन आली होती, त्या सुमारास आईसाठी केलेली ही फ्रेम. ४ फूट बाय ३ फूट आकाराची. फोटो फार बरा नाहीये पण तरीही टाकायचा मोह होतोय. पुन्हा कधी नीट कॅमेराने काढेन फोटो, तेव्हा डिटेल्स दिसतील.