हस्तकला
किल्ला
स्टोन वर्क ऑन शॉल्स--अजून अॅड केलेत
काही दिवसांपूर्वी क्वांगचौ इन्टरनॅशनल लेडीज क्लब द्वारा आयोजित केलेल्या क्रिसमस मेळ्यात ,मी ,माझ्या एका इंडोनेशिअन मैत्रीणीबरोबर शॉल्स चा स्टॉल लावला होता. या शॉल्सवर आम्ही स्वतःच स्टोनवर्क केलेले आहे.. अश्याप्रकारच्या मेळ्यात भाग घेऊन स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा सेल लावायची ही माझी पहिलीच वेळ,त्यातून मिळालेला रिस्पाँस ,आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन गेला.
हा आमचा स्टॉल
आणी हे काही नमुने
फुला पानांची नक्षी (रांगोळी)
ही मी काढलेली दिवाळीतील रांगोळी आहे. ह्या रचनेसाठी शेवंती, झेंडू, त्याच्या पाकळ्या, गुलछडी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पाने वापरली आहेत. जसे सुचले तशी रचत गेले फुल. गुलछडीच्या नैसर्गिक बाक आलेल्या देठांमुळे मला मध्ये गुलछडीचे चक्र करता आले आणि वर दोन फुले एकमेकांना फ्रिहॅन्डकरुन पाकळ्या करता आल्या.
पेपर क्विलिंग
माझ्या भाच्यासाठी केलेले जाकीट
स्वेटर - टोपी आणि छोटीशी पँट
पूर्वाने रंगवलेल्या पणत्या
दिवाळी शुभेच्छापत्रे
मागचे २ वर्षे स्कुलमुळ्ये दिवाळीला काही खास करता आलं नव्हतं. म्हणून ह्यावेळी काहीतरी करायचं ठरवलं. माझे बाबा दरवर्षी दिवाळीला सगळ्या आप्तेष्टांना, मित्र-मंड़ळींना ग्रिटिंग्ज पाठवतात. इथे अमेरिकेत दिवाळी ग्रिटिंग्ज मिळणं शक्य नाही आणि मिळाले तरी मराठीमध्ये मिळणं अजिबातच शक्य नाही. म्हणून मग घरीच ग्रिटिंग्ज बनवायचं ठरवलं. मायकल्स मधुन कागद, आणि रंग विकत आणले. आणि चक्क ७-८ तासांमध्ये जवळपास ३५ ग्रिटिंग्ज तयार झाले.
मेरे हाथमे तेरा हाथ हो...
अंगठी ठेवायला वापरतात पण मी बिझनेस कार्ड होल्डर म्हणून रंगवलेला हा नाजुक तळवा :).
उद्या पासून सुरु होणार्या दिवाळी फेस्टिवल ला हाच बिझनेस कार्ड होल्डर .