दिवाळी साठी खास रंगीत आणि सोनेरी, चंदेरी क्रोशे टीलाईट होल्डर.. मेटल वाटी आणि व्हाईट वॅक्स कँडल/गुलाब कँडल सहित उपलब्ध.. यात रेडिमेड लाईट्सही ठेवता येतात. मेटल वाटी काढता येते त्यामुळे सुशोभित वाटी सारखा उपयोग ही करता येतो. दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळी देवासमोर सुका नैवेद्य किंवा फुलं ठेवायला उपयोग होतो. शिवाय हळदीकुंकू वाण म्हणून ही देता येतं. पूर्णपणे एकसंध आणि हाताने वीणलेले आहेत.
https://www.facebook.com/saarascrafts
आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
तुम्हाला आणि तुमच्या आप्तस्वकीयांना दिवाळी निमित्त फराळी शुभेच्छा!!!
गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)-
कलाकार - पूर्वा (१२ वर्षे)
प्रेरणा - मायबोलीकर रुनी पॉटर यांनी रंगवलेल्या पणत्या
माझा सहभाग - मायबोलीवरचा बाफ दाखवणे, पणत्या आणून देणे