दिवाळी साठी खास रंगीत आणि सोनेरी, चंदेरी क्रोशे टीलाईट होल्डर.. मेटल वाटी आणि व्हाईट वॅक्स कँडल/गुलाब कँडल सहित उपलब्ध.. यात रेडिमेड लाईट्सही ठेवता येतात. मेटल वाटी काढता येते त्यामुळे सुशोभित वाटी सारखा उपयोग ही करता येतो. दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळी देवासमोर सुका नैवेद्य किंवा फुलं ठेवायला उपयोग होतो. शिवाय हळदीकुंकू वाण म्हणून ही देता येतं. पूर्णपणे एकसंध आणि हाताने वीणलेले आहेत.
https://www.facebook.com/saarascrafts
नुकत्याच जन्मलेल्या एका लहान बाळासाठी विणलेलं हे छोटसं स्वेटर ..
मी विणलेली कमळ फुलाची टोपी ....
ही टोपी बाळाला घातल्यावर मागील बाजुने कमळ दिसते.
भाजीच्या दुकानात मिळालेल्या पिशवीच्या साधारण १/२ इंच जाडीच्या पट्ट्या कापुन घेतल्या. गाठी मारुन त्या एकमेकींना जोडुन घेतल्या. त्यांचा गोल गुंडा तयार केला. आणि क्रोश्याच्या सुईने (नेहमीच्य पद्धतीने) विणकाम केले.
सगळे पुर्ण खांब आहेत आणि जाळीसाठी साखळ्या विणल्या आहेत.
साईज प्रमाणे उपयोग करता येईल.
१. टी कोस्टर
२. टेबल मॅट
३. छोट्या कुंडी / फ्लॉवरपॉट खाली
४. एखाद्या छोट्या मुर्ती खाली
दोन सुया वपरुन विणलेला गोल स्कार्फ. [Cowl / Infinity Scarf / Neck Warmer]
जाड लोकर आणि १० नंबरच्या सुया वापरल्याने अगदी झटपट आणि एकदम उबदार पण झाला.
एक उलट, एक सुलट असे टाके घालत ७० सुया विणल्या आहेत [पहिली आणि शेवटची सोडुन ७०]. मग दोन्ही बाजु शिउन टाकल्या. झाला स्कार्फ तयार.
झटपट आणि उपयोगी. उरलेल्या लोकरींचा / दोर्याचा योग्य वापर पण होतो.
थोडक्यात वीण देते आहे.
४ सखळ्यांचा गोल करुन घेतला. त्यात १२ अर्धे खांब घातले. जास्त खांब घातल्याने सुरुवातीपासुनच घट्ट्पणा येतो. दुसर्या ओळीला १,२,१,२ [ | \/ | \/ | ] असे करत वाढवत नेले. साधारण वाटी एवढा गोल झाल्यावर, शेवटच्या ओळिच्या साखळ्यांच्या "बाहेरच्या कडिवर" जेवढ्या साखळ्या तेवढेच अर्धे खांब घातले. (असे केल्यने आपोआप बाहेर वळते). मग एक मुक्या खांबांची ओळ घातली. हे पण घट्ट्पणा येण्यासाठी. मग हवी तेवढी उंची येइपर्यंत सरळ सरळ अर्धे खांब विणत गेले.
.
मायबोलीवर पुर्वप्रकाशित
ब्रेसलेट
ह्या सेट मधे कानातले करायचे बाकी आहेत
बेबी शाल, स्टार बेबी रॅप, साधे बुटु, सशाचे बुटु आणि मुठु ( मुठींचे मोजे )
प्रसिद्ध अननसाच्या डिझाईनचा क्रोशाने विणलेला लोकरीचा फ्रॉक
आणि हे एक डायमंड जाकिट
नविन कार्डः डिझाईन गुगलवरून.
अशाप्रकारे विणून भेटकार्ड तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न.
खास व्हॅलेंटाईनदिनासाठी
हे धागा आणि खिळे वापरून