बाळ आणि बाळाच्या आईसाठी कलाकुसर!
काही दिवसांपूर्वी माझ्या एका नातेवाईकांकडे एका लहान परीराणीचे आगमन झाले! आम्ही घरातले सगळेच त्या गोड बाळाच्या अगदी प्रेमात पडलो. माझा लेक आता बालपण संपवून तारुण्याच्या सीमेवर उभा आहे. त्यामुळे आता ही परी जेव्हा घरी येते, तेव्हा पुन्हा घरभर चैतन्य येत.
तिच्या साठी केलेले हे काही स्वेटर्स आणि बाळाच्या आईसाठी भरतकाम केलेला कमीझ.
ह्यातल्या पांढऱ्या लोकरीच्या झबल्याची कृती प्रतिभा काळेंच्या ‘लोकरीचे विणकाम’ ह्या पुस्तकातील आहे.
स्वेटर-टोपी आणि सर्वात लोकप्रीय झालेले बूट!
हा मी विणलेला क्रोशे स्वेटर आणि मॅचींग हॅट
हे बकुळीचे डिझाईन
आयुष्यात एक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःची वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही!
मला पहिल्यापासून विणकाम, भरतकाम करायला खूप आवडत. लहान असताना मण्याची तोरणे नाहीतर लहान लहान भरतकाम करत राहायचे. आता काम आणि संसार सांभाळताना वेळ कमी मिळतो. पण ‘आवड असली की सवड मिळते’ म्हणतात, तशी सवड काढून काहीतरी उद्योग चालू ठेवते. लेकाचा अभ्यास घेताना नाहीतर टी.व्ही. बघताना हात चालू असतो. नवऱ्यानेही आता निषेध नोंदवणे सोडून दिलय!!