लोकरीचे विणकाम
टोपी .
मी दोन सुयांवर विणलेली हि ससा टोपी.
आणि हे स्वेटर.
हे बदकाचं डिझाईन
टोपी .
टोपी .
मी दोन सुयांवर विणलेली हि ससा टोपी.
आणि हे स्वेटर.
हे बदकाचं डिझाईन.
गोल स्कार्फ
दोन सुया वपरुन विणलेला गोल स्कार्फ. [Cowl / Infinity Scarf / Neck Warmer]
जाड लोकर आणि १० नंबरच्या सुया वापरल्याने अगदी झटपट आणि एकदम उबदार पण झाला.
एक उलट, एक सुलट असे टाके घालत ७० सुया विणल्या आहेत [पहिली आणि शेवटची सोडुन ७०]. मग दोन्ही बाजु शिउन टाकल्या. झाला स्कार्फ तयार.
क्रोश्याचा छोटा डबा : Earring Holder + Jewelry Box.
झटपट आणि उपयोगी. उरलेल्या लोकरींचा / दोर्याचा योग्य वापर पण होतो.
थोडक्यात वीण देते आहे.
४ सखळ्यांचा गोल करुन घेतला. त्यात १२ अर्धे खांब घातले. जास्त खांब घातल्याने सुरुवातीपासुनच घट्ट्पणा येतो. दुसर्या ओळीला १,२,१,२ [ | \/ | \/ | ] असे करत वाढवत नेले. साधारण वाटी एवढा गोल झाल्यावर, शेवटच्या ओळिच्या साखळ्यांच्या "बाहेरच्या कडिवर" जेवढ्या साखळ्या तेवढेच अर्धे खांब घातले. (असे केल्यने आपोआप बाहेर वळते). मग एक मुक्या खांबांची ओळ घातली. हे पण घट्ट्पणा येण्यासाठी. मग हवी तेवढी उंची येइपर्यंत सरळ सरळ अर्धे खांब विणत गेले.
.
हॅल्लो किटी आणि अॅंग्री बर्ड
दिवसेंदिवस...माझं क्रोशे फॅड कमी होण्याऐवजी वाढतच चाल्लय.... आयॅम लव्हींग इट
ह्या जुळ्या बाळांसाठी विणलेल्या क्रोशाच्या टोप्या.
हॅल्लो किटी आणि अँग्री बर्ड.
ही मुग्गीसाठी
आणि ही मुग्ग्यासाठी
माझ्या अजुन काही क्रोशे पोस्ट्स..
Blue Hoodie क्रोशे स्वेटर
पुन्हा एकदा माझं क्रोश्याचं फॅड
पहिल्यांदाच एव्हढा मोठा स्वेटर विणायचा प्रयत्न केलाय.
हा मी विणलेला क्रोश्याचा स्वेटर(हुडी). कुठल्याही पॅटर्नशिवाय अंदजानेच विणलाय परंतू दहा वर्षांच्या मुलाच्या मापाचा आहे.
लेकाच्या हौसेखातर त्यावर नासा चा सोविनियर चिकटवलाय.
पिंकु स्वेटर आणि टोपी
हा मी विणलेला क्रोशे स्वेटर आणि मॅचींग हॅट
हे बकुळीचे डिझाईन