भाजीच्या दुकानात मिळालेल्या पिशवीच्या साधारण १/२ इंच जाडीच्या पट्ट्या कापुन घेतल्या. गाठी मारुन त्या एकमेकींना जोडुन घेतल्या. त्यांचा गोल गुंडा तयार केला. आणि क्रोश्याच्या सुईने (नेहमीच्य पद्धतीने) विणकाम केले.
सगळे पुर्ण खांब आहेत आणि जाळीसाठी साखळ्या विणल्या आहेत.
साईज प्रमाणे उपयोग करता येईल.
१. टी कोस्टर
२. टेबल मॅट
३. छोट्या कुंडी / फ्लॉवरपॉट खाली
४. एखाद्या छोट्या मुर्ती खाली

झटपट आणि उपयोगी. उरलेल्या लोकरींचा / दोर्याचा योग्य वापर पण होतो.
थोडक्यात वीण देते आहे.
४ सखळ्यांचा गोल करुन घेतला. त्यात १२ अर्धे खांब घातले. जास्त खांब घातल्याने सुरुवातीपासुनच घट्ट्पणा येतो. दुसर्या ओळीला १,२,१,२ [ | \/ | \/ | ] असे करत वाढवत नेले. साधारण वाटी एवढा गोल झाल्यावर, शेवटच्या ओळिच्या साखळ्यांच्या "बाहेरच्या कडिवर" जेवढ्या साखळ्या तेवढेच अर्धे खांब घातले. (असे केल्यने आपोआप बाहेर वळते). मग एक मुक्या खांबांची ओळ घातली. हे पण घट्ट्पणा येण्यासाठी. मग हवी तेवढी उंची येइपर्यंत सरळ सरळ अर्धे खांब विणत गेले.
.
क्रोशाचं विणकाम हा माझा आवडता छंद. आत्ता पर्यंत बरेचदा छोटे रुमाल, लहान बाळांची स्वेटर्स, तोरणं, शाल अस काही काही विणलं, भेटवस्तु म्हणून दिलही. फोटो काढून ठेवावेत हे कधी लक्षात आलं नव्हतं. बर्याचजणींच होत तस माझही झालं, लग्नानंतर हा छंद थोडा मागे पडला होता पण माबो. वरच्या अवल, मीन्वा, शांकली, जागू वै. सगळ्याजणीच पाहून पुन्हा विणकामाला हात लावलाच. त्यातून तयार झालेले काही नमुने आज पहिल्यांदाच तुम्हाला दाखवते आहे. आशा आहे तुम्हाला ते आवडतील
पुन्हा आवडत्या छंदाकडे वळण्यासाठी माबो. आणि माबो. च्या मैत्रिणींमुळे प्रेरणा मिळाली म्हणुन सगळ्यांना धन्यवाद.