बाळंतविडा
दुपटं
बाळंतविडा
बाळ आणि बाळाच्या आईसाठी कलाकुसर!
काही दिवसांपूर्वी माझ्या एका नातेवाईकांकडे एका लहान परीराणीचे आगमन झाले! आम्ही घरातले सगळेच त्या गोड बाळाच्या अगदी प्रेमात पडलो. माझा लेक आता बालपण संपवून तारुण्याच्या सीमेवर उभा आहे. त्यामुळे आता ही परी जेव्हा घरी येते, तेव्हा पुन्हा घरभर चैतन्य येत.
तिच्या साठी केलेले हे काही स्वेटर्स आणि बाळाच्या आईसाठी भरतकाम केलेला कमीझ.
ह्यातल्या पांढऱ्या लोकरीच्या झबल्याची कृती प्रतिभा काळेंच्या ‘लोकरीचे विणकाम’ ह्या पुस्तकातील आहे.
स्वेटर-टोपी आणि सर्वात लोकप्रीय झालेले बूट!
बाळंतविडा
एके ठिकाणी बारश्याला जाताना हे दोन फ्रॉक आणि एक छोटे ब्लॅन्केट टाईप दुपटं असं शिवून घेऊन गेले.
पूर्वी शिवलेल्या बेबी फ्रॉकातलं कापड उरलं होतं, त्यालाच चिकनच्या कापडाचा योक/बॉडी लावली. आणि वर रुंद सॅटिन पट्टीचा बो लावून टाकला. हे दोन्ही फ्रॉक साधारणपणे १ वर्षापर्यंतच्या मुलीला येतील.
फ्लॅनेलच्या कापडाचं छोटं ब्लॅन्केट टाइप दुपटं शिवलं आणि त्याला लाल सॅटिन पट्टीचे काठ लावले.
![Subscribe to RSS - बाळंतविडा](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)