लाल मखमलीवर सँटिन रीबननी केलेले भरतकाम
1
2
आवडल्यास जरुर सांगा
भरतकाम - शिवणकामाची मला लहानपणापासूनच फार आवड. शाळेत असताना आम्हाला होतं शिवणकाम आणि भरतकाम . मी अगदी हौसेने आणि मन लावून ते करत असे. भरतकामाचे माझे नमुने शाळेच्या नोटीस बोर्ड वर ही लावले जात असत. पण हे सगळं फक्त सातवी आठवी पर्यंतच. नंतर नव्हते हे विषय शाळेत.
लहान असताना सिन्ड्रेला ची गोष्ट ऐकली कि तीच्या पायातले काचेचे सुंदर बूट कसे असतील याचा विचार करत कल्पना करायचे, आपल्याला तसेच बूट मिळाले तर कित्ती मज्जा येईल असं वाटायचं. मग मोठे होत गेलो वय वाढल विचार बदलले पण सिन्ड्रेला चे बूट अजूनही एका कोपऱ्यात घर करून बसलेत, असो ...
थंडी सुरु झाली तेव्हा लागलीच बूट घेतले, म्हटलं काहीतरी करूया याच्यावर , विद्यालयात असताना एक प्रयोग केला होता बुटांवर म्हटलं आत्ता करायला काय हरकत आहे म्हणून सुरुवात केली पण थंडी गेली आणि माझा उद्योग पूर्ण झाला, जाऊदे पुढच्या हिवाळ्यात वापरता येतील आता....
तर हा माझा उपद्व्याप
हा मी भरतकाम केलेला चाकडा -
माप - ३२ इंच * ३२ इंच
वापरलेले टाके -
उलटी टीप
काश्मिरी टाका
साखळी टाका
१.
२.
माझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.
ही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.
१. मोर
२.
३.
१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच)
फिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.
ही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.
१. हा शॉर्टटॉप जीन्स वर घालण्या साठी भरला आहे. कच्छी टाका पूर्ण भरण्या आधी जी फ्रेम तयार होते ती वापरली आहे.
हे गळ्याचे डिज़ाइन.
२. या कुर्ती साठी कोणत्या प्रकारची सलवार, ओढणी { प्रिंटेड का प्लेन, तसेच कोणते रंग }चांगली दिसेल? या साठी सूचना कराव्यात.
हे बाही वरचे डिज़ाइन.