काही बेसीक टाके वापरून भरतकामाचा हा पहिलाच प्रयत्न तसेच मायबोली वर लिखाणाचाहीपहिलाच प्रयत्न. जाणकारांनी जरुर सूचना कळवाव्याता.

पहिल्या टॉपसाठी ड्बल गव्हाचा टाका, साखळी, हेरिंगबोन टाका, फ्लाय स्टिच वापरले. याचे डीझाईन एका ओळखीच्या काकूनी काढून दिले.
तयार टॉप

तयार टॉपवरुन प्रेरणा घेऊन दुसरा गुलाबी टॉप भरला. या टॉपसाठी डीझाईन मीच काढले. यात ड्बल गव्हाचा टाका, साखळी, फ्लाय स्टिच वापरले.

मी केलेले रुमालावरील भरतकाम
१.

२.

३.
बाळ आणि बाळाच्या आईसाठी कलाकुसर!
काही दिवसांपूर्वी माझ्या एका नातेवाईकांकडे एका लहान परीराणीचे आगमन झाले! आम्ही घरातले सगळेच त्या गोड बाळाच्या अगदी प्रेमात पडलो. माझा लेक आता बालपण संपवून तारुण्याच्या सीमेवर उभा आहे. त्यामुळे आता ही परी जेव्हा घरी येते, तेव्हा पुन्हा घरभर चैतन्य येत.
तिच्या साठी केलेले हे काही स्वेटर्स आणि बाळाच्या आईसाठी भरतकाम केलेला कमीझ.
ह्यातल्या पांढऱ्या लोकरीच्या झबल्याची कृती प्रतिभा काळेंच्या ‘लोकरीचे विणकाम’ ह्या पुस्तकातील आहे.
स्वेटर-टोपी आणि सर्वात लोकप्रीय झालेले बूट!
कुशन कव्हरवर केलेलं भरतकाम -
१.

२.

३.
माझ्या आईने भरतकाम केलेला 'योक' -

