नमस्कार मायबोलिकर,
मायबोलिवर लोकरिपासुन नव नविन वस्तु बनवलेल्या पाहुन माझ्याहि मनात आले कि आपणहि काहितरि करण्याचा प्रयत्न करावा..
घरात तसेहि खुप दिवसांपासुन लोकर पडुनच होते, मग ठरवले काहि तरी बनवण्याचा प्रयत्न करावाच... तेव्हा हे लोकरिपासुन बनवलेले मोबाईल कव्हर (जे मि माझ्या मनानि केले आहे).. आणि फुल (जे मला माझ्या आईने शिकविलेले आहे).. काहि चुकले असेल तर संभाळुन घ्यावे..
मायबोलीवरील सर्व दिग्गज तायांना स्मरून मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या फॅब्रिक पेंटिंगचा श्री गणेशा केला!
प्रचंड मज्जा आली ते करता आणि पुढची कापडं रंगवायला घ्यायचा उत्साह पण आला!
पेंटिंगबरोबरच थोडंसं थ्रेड वर्क (दोरा काम?) पण केलंय.
फिनिशिंग फार उत्तम असेलच असं नाहे, पण समजून घ्या!!
१. हा शॉर्टटॉप जीन्स वर घालण्या साठी भरला आहे. कच्छी टाका पूर्ण भरण्या आधी जी फ्रेम तयार होते ती वापरली आहे.
हे गळ्याचे डिज़ाइन.
२. या कुर्ती साठी कोणत्या प्रकारची सलवार, ओढणी { प्रिंटेड का प्लेन, तसेच कोणते रंग }चांगली दिसेल? या साठी सूचना कराव्यात.
हे बाही वरचे डिज़ाइन.
काही बेसीक टाके वापरून भरतकामाचा हा पहिलाच प्रयत्न तसेच मायबोली वर लिखाणाचाहीपहिलाच प्रयत्न. जाणकारांनी जरुर सूचना कळवाव्याता.
पहिल्या टॉपसाठी ड्बल गव्हाचा टाका, साखळी, हेरिंगबोन टाका, फ्लाय स्टिच वापरले. याचे डीझाईन एका ओळखीच्या काकूनी काढून दिले.
तयार टॉप
तयार टॉपवरुन प्रेरणा घेऊन दुसरा गुलाबी टॉप भरला. या टॉपसाठी डीझाईन मीच काढले. यात ड्बल गव्हाचा टाका, साखळी, फ्लाय स्टिच वापरले.