कालच केदार जाधव यांच्या चॅनल बद्दल थ्रेड पाहिला आणि मलाही माझ्या नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनलबद्दल लिहायचं इन्स्पिरेशन मिळालं!
मायबोलीवर बर्याच जणांना ऑलरेडी माहित असेलच, व्यवसायाने मी मेंदी/बॉडी पेंटिंग अर्टिस्ट आहे आणि काहींना माझी पॅशन फॉर स्टायलिंग्/फॅशनही माहित असेल !
या सगळ्याची सफर माझ्या चॅनलवर , ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअयल’ वर पहायला मिळेल !
चॅनल वर अधुन मधुन इंग्लिश व्हिडिओजही येतील पण मुख्यतः मराठी व्हिडिओज असतील .
अत्ता पर्यंत रिलिझ झालेले मराठी व्हिडिओज :
मायबोलीवरील सर्व दिग्गज तायांना स्मरून मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या फॅब्रिक पेंटिंगचा श्री गणेशा केला!
प्रचंड मज्जा आली ते करता आणि पुढची कापडं रंगवायला घ्यायचा उत्साह पण आला!
पेंटिंगबरोबरच थोडंसं थ्रेड वर्क (दोरा काम?) पण केलंय.
फिनिशिंग फार उत्तम असेलच असं नाहे, पण समजून घ्या!!


चपला, बूट, पादत्राणे, Shoes, Sandals, Chappal यांच्या नवीन फॅशनबद्दलचं हितगुज
सौंदर्य प्रसाधने ,कॉस्मेटीक्स. मेकअप, Cosmetics याबद्दलचं हितगुज
Discussion related to cosmetics and other beauty products.
दाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.
Discussions related to Jewelry
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १ च्या शेवटी अॅडमिन यांची सब कॅटेगरी करायची सूचना वाचली म्हणून हा वेगळा धागा काढते आहे. तिथे लिहिल्याप्रमाणे शोधायला सोपे जाइल कदाचित.
हँडबॅग्ज, पर्सेस, बॅगपॅक्स बाबतच्या गप्पा इथे मारुया (का?) . वेगळा धागा ऑलरेडी असेल तर आंगा म्हणजे हा उडवते.
खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.