माझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.
ही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.
शकुंतलेच्या गजर्याकरता, गळ्यातल्या आणि हातातल्या फुलांच्या माळेकरता खूप छान आणि नाजूक टाके घातले आहेत. तिचे केसही अगदी बारीक टाक्यांनी भरले आहेत.
दिवाणखान्यातल्या सोफ्याच्या पाठीवर घालण्याकरता बनवलेली ही चित्रे.
ही एक लहान मुलांच्या बेडवरची चादर :
चादरीवरची चित्रे जवळून :
पॅचवर्कमध्ये त्यातील कॅरॅक्टरच्या कपड्यांसाठी आकर्षक डिझाईन असलेली कापडं लागत. त्यावेळीच्या कपड्यांच्या दुकानात ताग्यातून उरलेली शेवटची थोडी थोडी कापडं एका बॉक्समध्ये घालून स्वस्त्यात विकायला ठेवलेली असत. आई नेहमी अशी कापडं निवडून निवडून आणत असे. अॅक्च्युअली, अजूनही बॅगभर कापडं घरी आहेत. ती काढून टाकायला काही आई तयार नाहीये.
यापैकी शकुंतला मी फ्रेम करून घेणार आहे. बाकीच्यांचं काय करावं ते कळत नाहीये.
सुंदर
सुंदर
खूपच सुंदर आणि सुबक आहे
खूपच सुंदर आणि सुबक आहे पॅचवर्क. शकुंतला फ्रेम करुन घे आणि बाकीच्या नमुन्याच्या बाजूने ४-५ इंच कापड ठेवून चौकोन काप. हे चौकोन चारही कोपर्यांना फेव्हिकॉल लावून जर्नल सारखे एका मोठ्या वहीत चिकटवून ठेव. प्रत्येक पानासोबत एक ट्रेसपेपर सारखा पेपर असलेली वही घे. माझ्या आत्याकडेही असे बरेच नमूने आहेत आणि तिने ते असेच प्रिझर्व केले आहेत. तिने पॅचवर्क केलेला एक पडदा माझ्याकडे आहे. लक्षात राहिलं तर फोटो काढून इथे टाकेन. "द्रौपदीची थाळी" अशी थीम आहे त्या पॅचवर्कची.
आणि हो! जमल्यास आईला विचारुन प्रत्येक चित्राखाली वहीवर पॅचवर्कसोबत भरतकामाचे उलट टिपेशिवाय अजून कुठले टाके वापरले असतील तर तेही लिहून ठेव. बटन होल, फिशबोन टाके दिसत आहेत त्या चित्रांमध्ये. माझ्या आत्याने अस्संच केलंय
केश्वे, छान आहे तुझी कल्पना.
केश्वे, छान आहे तुझी कल्पना. तसंच करते. धन्यवाद.
मामी मस्तच ग. खूप छान
मामी मस्तच ग. खूप छान .
शकुंतला फ्रेम करून मस्तच वाटेल .
मस्तच
मस्तच
शकुंतला फ्रेम करून मस्तच
शकुंतला फ्रेम करून मस्तच वाटेल . >>> हो गं.
मामी, आई खरोखर ग्रेट आहे.
मामी, आई खरोखर ग्रेट आहे. बाकीचे कॅरेक्टर्स हॉरिझोन्टली प्लेस करून त्याची फ्रेम पण छान वाटेल.
अगदीच रहावले नाही म्हणून हे बघ.
मस्त !!!!!!
मस्त !!!!!!
किती क्युट आहेत ते कार्टुन्स
किती क्युट आहेत ते कार्टुन्स

आनि शंकुतला च पॅचवर्क पन मस्त.
खुपच छान
खुपच छान
मामी, खूपच सुंदर आहेत सर्व
मामी, खूपच सुंदर आहेत सर्व पॅच वर्क्स. शंकुतलेचा गजरा हा लोकरीने विणलेला आहे का??? खूपच सुंदर आहे.
आरती, गळ्यातला आणि हातातला
आरती, गळ्यातला आणि हातातला गजरा गव्हाच्या टाक्याने भरलेला दिसतोय.
अरे वा, सामी, मस्तच. खरंच
अरे वा, सामी, मस्तच. खरंच छान दिसतंय. धन्यवादच गं.
खुपच छान.............
खुपच छान.............
वॉव !! बेटी तो है ही, मा भी
वॉव !!
बेटी तो है ही, मा भी कमाल !!
खूप छान !! शकुंतला तर लयी भारी.
कितीही मेहनत लागली तरी हरकत नाही पण हे सगळं जपुन ठेव, पाहिजे तर त्यासाठी नवीन धागा काढुन सल्ले घे जाणकारांचे.
आरती, लोकर नाहीये. रेशमानीच
आरती, लोकर नाहीये. रेशमानीच भरलंय.
मस्त !
मस्त !
सुंदर! इतकी सुंदर शकुंतला
सुंदर! इतकी सुंदर शकुंतला कधीच पाहिली नव्हती.
मामे कसलं सुंदर आहे हे.
मामे कसलं सुंदर आहे हे.
खूपच सुंदर आहे. इतके सुंदर
खूपच सुंदर आहे. इतके सुंदर काही करायचा विचारही केला नव्हता. आता ट्राय करेन.
सुंदर!!!
सुंदर!!!
सुंदर आहेत सगळेच नमुने.
सुंदर आहेत सगळेच नमुने. विशेषतः कारटुन्स फारच गोड
वॉव मस्तच गं मामे. खुप सुंदर.
वॉव मस्तच गं मामे. खुप सुंदर.
मामी अग कित्ती क्युट कलाकृती
मामी अग कित्ती क्युट कलाकृती केल्या आहेत तुझ्या आईने. त्यांना नमस्कार पोहोचव.
खर तर काय बोलावे तुझ्या आईचे कलेबद्दल हेच सुचत नाही. पण हॅट्स ऑफ.
माझी आई पण पूर्वी खुप कलाकृती करायची. क्रोशाची दोर्याची तोरणे, रुमाल, वायरचे फ्लॉवर पॉट्स, लोकरीची तोरणे, शिवणकाम अजून बरेच काही पण त्यावेळी ह्या कला कॅमेराबद्ध केल्या नसल्याने आता त्याचे नमुनेही नाही राहिलेत. आई आता ७० रिच्या घरात आहे त्यामुळे आता ती ह्या कलाकृती काही करू शकणार नाही त्यामुळे मला हळहळ वाटते.
माझी आई पण पूर्वी खुप कलाकृती
माझी आई पण पूर्वी खुप कलाकृती करायची. क्रोशाची दोर्याची तोरणे, रुमाल, वायरचे फ्लॉवर पॉट्स, लोकरीची तोरणे, शिवणकाम अजून बरेच काही पण त्यावेळी ह्या कला कॅमेराबद्ध केल्या नसल्याने आता त्याचे नमुनेही नाही राहिलेत. आई आता ७० रिच्या घरात आहे त्यामुळे आता ती ह्या कलाकृती काही करू शकणार नाही त्यामुळे मला हळहळ वाटते.
>>> डिट्टो आजी साठी...आधि काही शिकले नाही आणि रेकॉर्ड पण केल ना ही ह्याच वाइट वाटत//
अश्विनी ओके. मामी रेशमाच्या
अश्विनी ओके.
मामी रेशमाच्या धाग्यांनी किती सही केल आहे.
मस्तं ग मामे! आज्जींचं
मस्तं ग मामे!
आज्जींचं माबोकरांतर्फे कौतुक कर.
आणि अश्विनी म्हणते तसा एक मस्तं अल्बम करून घे.
अप्रतीम
अप्रतीम
खुपच छान शकुंतला! क्युट
खुपच छान शकुंतला! क्युट कार्टुन्स
फार सुंदर आहे हे
फार सुंदर आहे हे
Pages