मेन्दी वपरून निरनिराळ्या मटेरिअल वर प्रयोग करणे नेहेमीच चालु असते त्यात गणेश उत्सवात ठेवलेल्या 'टाकाउतून टिकाउ' च्या निमित्तानी बर्याच टाकाउ वस्तु रंगवायची प्रेरणा मिळाली :).
अता दिवाळी निमित्त वेळ मिळेल तसं एक एक सामान बाहेर काढतेय :).
हा जुना डबा , पेडिक्युअर कोस्मॅटिक किट चा ( (पत्र्यासारखं मटेरिअल आहे.)
रिकामा डबा खूप दिवसापासून अडगळीत पडून होता पण इतका छान आकार आहे म्हणून फेकून दिला नाही,
शेवटी दिवाळी निमित्त एकदाचा बाहेर काढून रंगवायचा मनावर घेतलं :).
सिद्धार्थने शास्त्रवाहीनी उपक्रमाअंतर्गत केलेली टेकडी आणि मंदीर
साहीत्यः
थर्मोकोल, खळ, रांगोळीचे रंग, कागद, काडी, फेविकॉल
माझा आधीचा स्वेटर पाहून मला मिळालेली ही पहीली ऑर्डर.
खूप जणींनी वीण आणि स्वेटर कसा करायचा ते लिहायला सांगीतलंय ते मी लिहीणारे पण वेळेची मारामारी आहे. वेळ झाला की लिहीन. हे मी इकडे लिहीलंय. http://www.maayboli.com/node/19914
स्वेटर घालून रमा:
टोपी वरच्या चित्रात जी दाखवली होती ती जरा लहान होत होती. मग ती जरा उसवून मोठी टोपी केली तेव्हा पॅटर्न थोडा बदलला आणि मिनोतीने सांगीतलेलं करेक्शन पण केलं. टोपी आणि स्वेटर घालून रमा.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे अनेकजण आपल्या कलाकृति सादर करत आहेत त्या बघुन मला स्फुर्ती आली. मी आज कागदाची फुले केली. मी ऑफिसमधे रिकामा वेळ मिळाला कि हि करतच असतो.
आपण जी क्रेप कागदाची फुले करत असू, तशीच हि करतो. पण यासाठी मी कॉम्प्यूटरच्या कंटिन्यूअस स्टेशनरीचा कागद वापरतो. मला यासाठी कात्री, गोंद वगैरे काहीच लागत नाही. या पाकळ्या मी हातानेच कागद फाडून बनवतो. आधी मधे एक कपटा चुरगाळून कळीसारखा आकार करुन घेतो, आणि त्याभोवती पाकळ्या रचत जातो. या पाकळ्यांच्या कडा किंचीत गुंडाळून घेतो. तळाशी हातानेच पिळ देत पाकळ्या घट्ट बसवत जातो. शेवटी देठाला, याच कागदाची कडेची पट्टी, गुंडाळून घेतो.
मैत्रिणीला नात झाली म्हणून हा छोटुकला फ्रॉक आणि हे दुपटं शिवलं. . पण दुपटं मोठं आहे. नात चांगली २/३ वर्षांची होईपर्यंत वापरता येईल.
माझी नवी कलाकारी. (स्वेटरच्या खाली आहे ती कांथा वर्क असलेली ओढणी - (मी केलेली नाही - विकतची :P))
टोपी केली या स्वेटरवरची आणि छोटे शूज करायचा बेत आहे. एका ठीकाणी रहावं म्हणून टोपी इथेच टाकतेय.
शूज
एकत्र असं दिसतंय.
रंगवलेली Envelops ( फोटो जरा धुरकट आलाय )
माझ्या आजीची देवावर खुप श्रद्धा. तिचा देव्हारा बघणं म्हणजे घरी आलेल्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय असायचा. तिचं नेहमी म्हणणं असायाचं आपल्याला कसे चांगले चांगले कपडे, दागिने घालायला आवडतं तसचं देवालाही ते आवडतं. म्हणुन ती तिच्या देव्हार्यातल्या सगळ्या देवांच्या मूर्तींना वस्त्रे आणि दागिने घालायची. त्यावरुनच मला एकदा सुचलं की तू इतके महागाची वस्त्रे विकत आणण्यापेक्षा मी तुला शिवुन देईन. तेव्हापासुन मी दर सुट्टीत मामाकडे गेले कि आजीला वर्षभर पूरतील इतकी वस्त्रे शिवुन घ्यायचे. त्यातही सणासुदीला वेगळे, रोजचे वेगळे असे प्रकार होते.
हे माझ्या आईने माझ्या ड्रेसवर केलेलं भरतकाम -
आणि हे मी आणि आईने मिळून केलेलं शिरीनसाठी दुपटं -