ऑफीसमध्ये हॉलोवीनची स्पर्धा होती शुक्रवारी.(इतक्या लवकर कारण आमचा ग्रूप नंतर अमेरीकेत नसणार होता). २० मिनीटे होती फक्त. सामान ऑफीसने दिले. ५ मिनीटे आधी सामान बघायला वेळ. त्यात ठरवायचे की काय व कसे बनवायचे ते. नियम हेच होते की
१) दिलेल्या सर्व वस्तू ह्या वापरायच्या'च' कशाही रितीने. २) जरा तरी कार्विंग केलेच पाहिजे. ३) आत मध्ये लाईट घालायची सोय पाहिजे.
सध्या कामामुळे पॉटरी बंद आहे म्हणुन माझ्या एका मैत्रिणीच्या आईने पाठवलेल्या डिझायनर पणत्या रंगवुन हौस भागवली
बाबांनी बनवलेला.. पुन्हा एकदा घरात साठवलेली खोकी, पत्रिका वगैरे वापरुन..
मधल्या रंगीत कोर्या भागावर पणत्या काढायचं काम माझ्याकडे दिलंय त्यामुळे अजून पूर्ण झालं नाहीये
घरातल्या साठवलेल्या पत्रिका, वेगवेगळ्या प्रकारचे कागद, थर्मोकोलचे तुकडे, रंगीबेरंगी कागद वापरुन बाबांनी हा बंगला बनवला..
रात्रीच्या वेळी बंगल्यात बल्ब लावलेला असताना..
आता बल्ब काढून पांढरा सीएफल लावला आहे.
वरुन काढलेला फोटो..
गेल्या वर्षी मी आमच्या घरा बाहेर घातलेलि फुलांची रांगोळी.
हा जवळुन:
हा लांबुनः
हे गणपतीचं कोलाज..... मी केलेलं.
मागे एकदा भरतकाम करुन वारली पेंटींग केलं होतं..
http://www.maayboli.com/node/5120 इथे टाकलं होतं
चांगलं दिसत होतं पण फार रिकामं रिकामं वाटत होतं ... मग फॅब्रीक कलर आणून ते रंगवलं आता असं दिसत आहे.
गोविंदा आला रे !
माझ्या राहूटीत शिरला मोर रे...
आला आला माखन चोर रे...
निळं निळं तनू भाळी मोर पिसारा
दुध, तुप, लोणी खाउन केला पोबारा
त्याला बांधावा तर मिळेना गं दोर रे...
आला आला माखन चोर रे...
भरलेला घडा होता टांगला वर
एका वर एक त्यांनी रचले गं थर
वर नंदाच कार्ट पोरं रे....
आला आला माखन चोर रे...
ऐकेना पोरं हाती घेतली मी काठी
एक एक रट्टा दिला एकेका पाठी
माझ्या जिवालाच लागला घोर रे...