मेंदीने सजवलेल्या मेणबत्त्या

Submitted by दीपांजली on 16 October, 2009 - 19:10

खास दिवाळी निमित्त :
mb05.jpgmb02.jpgmb01.jpgmb04.jpgmb07.jpgmb08.jpgmb03.jpgmb091.jpgmb.jpgmb92.jpg

(मिडियम : मेंदी, स्वॉरोओस्की स्टोन्स, नॉन फ्लेमेबल सिलर )

गुलमोहर: 

नकुल,
ट्रायल घेऊन या कँडल्स निवडल्यायेत,या मधोमध वितळतात, बाहेरच्या कोटिंग वर मेण सांडत नाही.
सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणाजे फ्लेमलेस (सेल वरच्या) कँडल्स.(खालून चौथ्या फोटो मधे उजवीकडची फ्लेमलेस कँडल आहे.)
फ्लेमलेस कॅडल्स चे अजुन फोटो रात्री अपडेट करते , अत्ता सिलर कोट लावून वाळत ठेवल्यायेत.

दीपांजली, सुरेख! अप्रतिम सजवल्यात सगळ्याच मेणबत्त्या!

(हाताळताना मेंदी निघून पडत नाही का?)

सगळ्यांना थँक्स !
गजानन, मनुस्विनी,नासा,

मेंदी आर्टवर्क वाळल्यावर डबल कोट मधे सिल केलय, अजिबात पडत नाही, अगदी अत्ता भारतात काही कँडल्स पाठवल्या , एकदम सुखरुप , एकही लाइन फ्लेक न होता.:).

मेणबत्त्या लावता येतात, चांगल्या क्वलिटीच्या बाहेर च्या कोट वर न गळणार्‍या मेणबत्या बघून घ्याव्या लागतात.
तरीही लोकांना पेटवायचं लावायचं जीवावर येतं म्हणून मग फ्लेमलेस , बॅटरी वर चालतात त्या कँडल्स आहेत सोल्युशन !:).

माझ्याकडे डीजेने दिलेल्या मेणबत्त्या आहेत, लोकांना खूप आवडतात, पण पेटवून वितळू द्यायला मला तरी नको वाटतं, पेटवली तरी लक्ष्मीपूजन, दसरा अशा वेळी पेटवून लगेच बंद करते मी Happy

Pages