हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे
.
सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच 
प्रचि १.

प्रचि २.

या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही
इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.
हे माझ्या फेबु पेजवरुन
रद्दी काढल्यावर त्यात काही जुनी मॅगझीन्स् सापडली. मग काय, लगेच कापाकापी करून हा सेट बनवला.

मधल्या पायर्यांचे फोटो काढायचे राहून गेले. त्यामुळे या वेळी फक्त कृती देत आहे.
साहित्य :-