२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि आऊटडोअर्सने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर ....? दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. आऊटडोअर्सने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले.
नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे पाचवे वर्ष. हा उपक्रम आता तसा आपल्याला नवा नाही. तरीही नवीन सभासदांना माहिती व्हावी ह्यादृष्टीने ही थोडक्यात ओळख.
ह्या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना वस्तुरुपात मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. त्याकरता देणग्या मागवण्याचे हे आवाहन आहे.
देणग्या मार्च-एप्रिल ह्या २ महिन्यात मागवण्यात येतात. नंतर एकुण जमा झालेल्या निधीतुन संस्थांच्या प्राधान्यानुसार वस्तु खरेदी करुन त्यांना पोचवल्या जातात व त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते.
ही झाली थोडक्यात ह्या उपक्रमाची ओळ्ख.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. अगदी दर दहा कोसांवर मराठीचं रुपडं बदलतं. वर्हाडी, अहिराणी, मालवणी, बेळगावी, कोल्हापुरी, नागपुरी, झाडीबोली अशा अनेक बोलीभाषांतून विविध विषयांना सामावणारं, लोकांशी थेट आणि जवळचा संवाद साधणारं लिखाण झालं आहे. बहिणाबाईंची कविता अहिराणीत होत्या. मालवणी दशावतारांसारख्या लोककलांमधून सर्वत्र पोहोचली. झाडीबोली रंगभूमी आजही पूर्व विदर्भात जोम धरून आहे.
शोधा म्हणजे सापडेल.............
चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन
ओळखा पाहू यात लपलं आहे कोण ?
रोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.
ही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.
अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य आणि वाक्यांपासून भाषा बनते. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर मुळात आपली शब्दसंपत्ती उत्तम असण्याची गरज असते. आजच्या खेळात आपण आपली शब्दसंपत्ती अजमावून बघायची आहे बरं का!
आम्ही तुम्हांला एक अक्षरसमूह देणार आहोत. त्यातील अक्षरांना विरामचिन्हे लावून, अथवा त्यांची जोडाक्षरे बनवून तुम्ही जास्तीत जास्त शब्द बनवायचे आहेत.
लहान मुलांचे आजार
डोक्यात कळ नेणारी टांचदुखी
पाठीचे दुखणे
डी व्हिटॅमिनची डेफिशिअन्सी
मोव्हेंबर: पुरुषस्वास्थ्यासाठीचा जागतिक उपक्रम
ओळखीचे वाटतात वरचे विषय? वाटणारच! मायबोलीच्या आरोग्यविभागातल्या चर्चा आहेत या.
बरं.. हे माहीत आहे का ?
१९१३ साली क्षयरोगावरील संशोधनासाठी मेडिकल रिसर्च कौन्सिलची स्थापना झाली. त्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली.
१९२९ साली सर हॉपकिन्स यांना 'वाढ आणि निरोगी आयुष्यासाठी व्हिटॅमिनचं आहारातलं महत्त्व' शोधून काढण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.
आज जग प्रचंड वेगानं बदलतंय. एका कोपर्यात घडलेल्या घटनेचे पडसाद क्षणार्धात जगभर उमटत आहेत. सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून अनेक ओळखी वाढत आहेत आणि जुन्या ओळखी दृढ होत आहेत. नवनवीन संशोधनं रोजच्या रोज प्रकाशित होत आहेत.... सतत आणि असंख्य घडामोडी.
या घटनांचा, बदलांचा, प्रगतीचा प्रत्येकाच्या जीवनावर कमीअधिक प्रमाणात परिणाम होतच असतो.
मायबोली आयडी : अल्पना
पाल्याचे नाव : आयाम देपुरी
वय : सव्वापाच वर्षे
या पत्रातले शब्द, वाक्य पुर्णपणे मुलाचे आहेत. त्याला पत्र नक्की काय असतं हे माहित नव्हतं. त्यासाठी मी त्याला गणेशोत्सवाची जाहिरात वाचून दाखवली होती. तसेच पत्राचे मायने काय काय असतात, शेवटी काय लिहितात हेही सांगितले होते. त्याने पत्राचा मजकुर मला सांगितल्यावर मी आधी पत्र लिहून काढले आणि मग त्याला डिक्टेट केले. त्यासाठी त्याला कुठे काना /मात्रा/ वेलांटी द्यायची हे सांगितले.